महाराष्ट्र लेक लाडकी योजना 2023: लेक लाडकी योजना ऑनलाईन अर्ज आणि पीडीएफ फॉर्म | Lek Ladki Yojana information in marathi
Lek Ladki Yojana information in marathi |
लेक लाडकी योजना महाराष्ट्र संपूर्ण माहिती | Lek Ladki Yojana information in marathi | Lek Ladki Yojana 2023 Maharashtra
Lek Ladki Yojana 2023 Maharashtra:तुम्ही अशी योजना शोधत आहात जी तुमच्या मुलीला तिची स्वप्ने पूर्ण करण्यात मदत करू शकेल? तर नुकताच महाराष्ट्र राज्याचा 2023 चा अर्थसंकल्प राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला आहे.
या अर्थसंकल्पामध्ये विविध असे महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. त्यामध्ये महिला सक्षमीकरणासाठी म्हणजेच मुलींच्या उच्च शिक्षणासाठी एक महत्त्वाची सुरू सुरू करण्याची घोषणा या अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे.
या योजने द्वारे मुलींच्या उच्च शिक्षणासाठी वयाच्या 18 व्या वर्षापर्यंत (आर्थिक मदत )पैसे सरकारकडून दिले जाणार आहे.ही योजना कोणती योजना आहे.या योजनेसाठी कोण पात्र आहे व लाभ घेण्यासाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे कोणती आहे याबद्दल सर्व माहिती या लेखामध्ये आपण आज घेणार आहोत. तरी आले तुम्ही शेवटपर्यंत नक्की वाचा.
या योजनेचे नाव लेक लाडकी (Lek Ladki Yojana Maharashtra)असे आहे. मुलींना आर्थिक दृष्ट्या सक्षम आणि स्वतःच्या पायावर उभे राहता यावे व समाजात योगदान देण्यास सक्षम करणे यासाठी महाराष्ट्र सरकारने ही योजना गेल्या 9 मार्च रोजी अर्थसंकल्पामध्ये घोषित केली.
काय आहे ही लेक लाडकी योजना ? Lek Ladki Yojana information in marathi
योजनेचे नाव | लेक लाडकी योजना महाराष्ट्र |
---|---|
लॉन्च तारीख | 9 मार्च 2023 |
लाभार्थी | राज्याची मुलगी |
अधिकृत वेबसाईट | लवकरच अधिकृत वेबसाईट सुरू करण्यात येणार आहे |
या योजनेअंतर्गत मुलीच्या वयाच्या १८ व्या वर्षापर्यंत 98 हजार रुपयांची मदत सरकारकडून देण्यात येणार आहे. हे सर्व रक्कम मुलीला / लाभार्थ्यांच्या बँक खात्यात अनुदान स्वरूपात आर्थिक मदत सरकार देईल. टप्प्याटप्प्यामध्ये देण्यात येणार आहे.
लेक लाडकी या योजनेअंतर्गत मुलीला कशाप्रकारे पैसे मिळणार आहे ते पुढील प्रमाणे.
जन्मानंतर मुलीला पाच हजार रुपये
- इयत्ता पहिली गेल्यानंतर चार हजार रुपये
- इयत्ता सहावी त सहा हजार रुपये
- इयत्ता गेल्यानंतर आठ हजार रुपये.
- आणि
- मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला 75 हजार रुपये देण्यात येईल.
लेक लाडकी या योजनेसाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे
- मुलीचे आधार कार्ड
- मुलीचे बँक खाते पासबुक
- तिच्या वडिलांचे/आईचे खाते.
- रहिवासी दाखला.
- पासपोर्ट
- उत्पन्नाचा दाखला.
- पालकांचे आधार कार्ड
- संपर्क क्रमांक.
लेक लाडकी या योजनेसाठी या योजनेसाठी कोण पात्र आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीचा जन्म महाराष्ट्र राज्यातील असावा व तिचा परिवार महाराष्ट्रा राज्याचा रहिवासी असावा.तसेच या योजनेच्या लाभ घेण्यासाठी उमेदवाराकडे पिवळ्या व केशरी रंगाचे कार्ड असणे गरजेचे.
महाराष्ट्र लेक लाडकी योजना 2023: लेक लाडकी योजना ऑनलाईन अर्ज आणि पीडीएफ फॉर्म
जसे की वर सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारमधील महाराष्ट्राचे वित्तमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी एक लाडकी योजना या योजनेची घोषणा केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी व आवेदन फॉर्म भरण्यासाठी आतापर्यंत कोणतेही ऑनलाइन प्लॅटफॉर्म व पीडीएफ फाईल उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. सरकार द्वारे ऑनलाईन पोर्टल किंवा पीडीएफ फॉर्म जसे उपलब्ध करून दिले जाईल तसे या वेबसाईटवर अपडेट केले जाईल
शेवटी, लेक लाडकी योजना 2023 महाराष्ट्र ही उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होऊ इच्छिणाऱ्या मुलींसाठी एक उत्कृष्ट योजना आहे. या योजनेचा प्रसार करा आणि अधिकाधिक मुलींना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यात मदत करा.
तरी हे होते लेक लाडकी Lek Ladki Yojana 2023 Maharashtra या योजनेबद्दल माहिती तुम्हाला या योजनेबद्दल आणखी माहिती हवी असेल आणि याबद्दल काही प्रश्न व समस्या तुम्हाला जर असेल तर खाली कमेंट मध्ये नक्की विचारा आणि ज्यांना या योजनेची आवश्यकता आहे त्यांना नक्की हा लेख शेअर करा.
0 टिप्पण्या