सावित्रीबाई फुले भाषण 2024 मराठी | savitribai phule bhashan marathi | Savitribai phule jayanti speech in Marathi.
savitribai phule speech in marathi : भारतीय समाजातील पहिली शिक्षिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांचा जन्मदिवस दरवर्षी 3. जानेवारी म्हणजेच सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस संपूर्ण देशामध्ये बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो.
सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस या निमित्त शाळा महाविद्यालयामध्ये भाषण स्पर्धा तसेच वक्तृत्व स्पर्धा घेतल्या जातात. त्यानिमित्ताने अनेक विद्यार्थी सावित्रीबाई फुले यांचे भाषण savitribai phule bhashan Marathi शोधत असतात. त्यांच्यासाठी आम्ही खास सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिवस निमित्य मराठी मध्ये भाषण घेऊन आलेलो आहोत.
हे भाषण अतिशय सोप्या आणि साध्या पद्धतीने सांगितलेले आहे .सावित्रीबाई फुले भाषण मराठीमध्ये हे भाषण सर्व विद्यार्थ्यांसाठी म्हणजेच वर्ग चार, पाच,सहा सात,आठ, नऊ,दहा पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी उपयोगी असणार आहे.
सावित्रीबाई फुले मराठी भाषण हे भाषण तुम्ही आपल्या शाळा महाविद्यालयांमध्ये होणाऱ्या भाषणामध्ये याचा वापर करू शकता.तर चला मग बघू या सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिवस वर मराठी भाषण.
सावित्रीबाई फुले भाषण मराठी 2024 | Savitribai phule speech in Marathi. | savitribai phule bhashan marathi madhe
सावित्रीबाई फुले या संपूर्ण भारतभर व महाराष्ट्राला महात्मा ज्योतिबा फुले यांची पत्नी म्हणून परिचित आहे. परंतु त्यांचा हा परिचय इतक्या पुरताच मर्यादित नाही.सावित्रीबाईंनी स्वतःच्या म्हणजेच स्व कर्तुत्वाने आपले समाज सुधारण्याच्या क्षेत्रामध्ये वेगळे स्थान निर्माण केले आहे.
मराठी शिक्षणप्रसारक, समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी नायगाव तालुका खंडाळा जिल्हा सातारा या गावी झाला.
सावित्रीबाईंच्या आईचे नाव लक्ष्मीबाई, तर वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते. खंडोजी नेवसे हे गावचे पाटील होते. गावचे पाटील असणाऱ्या नेवसे यांचे घराणे हे पेशवे काळातील इनामदार घराणे होते.घरची परिस्थिती चांगली असल्याकारणाने साहजिकच सावित्रीबाईंचे बालपण अतिशय मजेत आणि सुंदर गेले.
त्यावेळच्या प्र थे प्रमाणे सावित्रीबाईचा विवाह सातारा जिल्ह्यातील कटगुन या गावच्या ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. त्यावेळी सावित्रीबाईचे वय अवघे नऊ वर्षाचे होते तर ज्योतिबा यांचे वय तेरा वर्षाचे होते.
ज्योतिराव फुले यांचे शिक्षणाकडे विशेष आकर्षक होते. ज्योतिराव इंग्रजीचे शिक्षण घेत असतानाच त्यांचा विवाह दिवस सावित्रीबाई यांच्याशी झाला.
सावित्रीबाई यांचा विवाह जेव्हा झाला होता. तेव्हा त्या आपल्या सोबत ख्रिस्ती मिशनऱ्या कडून भेटलेले पुस्तक सोबत घेऊन जोतिबांच्या घरी आल्या होत्या.त्यावरून जोतिरावांनाही एक नवा मार्ग सापडला. त्यांनी स्वतः शिकून सावित्रीबाईंना शिकवले.
सावित्रीबाई फुले या मराठी शिक्षणप्रसारक, समाजसुधारक महिला होत्या. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती जोतिबा फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली.
महात्मा फुले यांच्या समाज सुधारण्याच्या कार्यास सावित्रीबाई फुले यांनी मनापासून साथ दिली त्यांच्या कार्यात त्यांनी त्यांच्या बरोबरीने वाटा उचलला. हे कार्य करत असताना वेळप्रसंगी समाजाची निंदा व अवहेलना सुद्धा त्यांनी सहन केली.
1848 साली स्त्रिया व अस्पृश्य यांना शिक्षण देणे हा गुन्हा होता. त्या काळात महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी 1 जानेवारी 1848 रोजी मुलींची पहिली शाळा भिडे यांच्या वाड्यात काढली.
त्यांनी ही काढलेली शाळा ही महाराष्ट्रातील पहिलीच मुलीची शाळा होती. त्या शाळेमध्ये सावित्रीबाई फुले या स्वतः मुख्याध्यापक म्हणून काम पाहू लागल्या. सुरुवातीला त्यांच्या शाळेमध्ये पाच ते सहा विद्यार्थिनी होत्या.पण १८४८ साल संपेपर्यंत ही संख्या ४०-४५ पर्यंत जाऊन पोहोचली.
या शाळेची प्रगती पाहून समाजातील अनेक सनातन्यांनी त्यांचा विरोध केला. अंगावर शेण फेकले. काही उन्मत्तांनी तर अंगावर हात टाकण्याची भाषा केली.घर सोडावे लागले. अनेक आघात होऊनही सावित्रीबाई डगमगल्या नाहीत
अनेक संघर्ष करत हा शिक्षणप्रसाराचा उपक्रम चालूच राहिला.
त्या काळामध्य बाला-जरठ विवाहप्रथेमुळे अनेक मुली वयाच्या बारा-तेराव्या वर्षी विधवा व्हायच्या. ब्राह्मण समाजात विधवा-पुनर्विवाह अजिबात मान्य नव्हता. पतीच्या निधनानंतर अशा विधवांना सती जावे लागे किंवा मग त्यांचे केशवपन करून कुरूप बनविले जाई.महात्मा फुले यांना आपल्या समाजात विधवा स्त्रियांना भोगाव लागणाऱ्या यांना पाहून त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची गरज वाटू लागली.
अशा दुर्दैवी स्त्रियांना दिलासा व आधार देण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1863 मध्ये प्रतिबंधक गृह सुरू केले. सावित्रीबाईंनी ते समर्थपणे चालविले.सावित्रीबाई फुले यांचा सत्यशोधक समाजाच्या कार्यामध्ये यामध्ये सहभाग असायचा.ज्योतिरावांच्या निधनानंतर सत्यशोधक समाजाचे कार्य कोणी करायचे असा प्रश्न निर्माण झाला होता. या अशा बिकट परिस्थितीत सावित्रीबाई स्वतः पुढे आल्या आणि महात्मा फुले यांच्या निधनानंतर सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा सांभाळली.
स्त्रियांनी शिकावे हे त्यांचे ब्रीद वाक्य होते.सावित्रीबाईंच्या सामजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून १९९५ पासून ३ जानेवारी हा सावित्रीबाईचा जन्मदिन हा *बालिकादिन* म्हणून साजरा केला जातो.सावित्रीबाई फुले या उत्तम लेखिका कवित्री सुद्धा होत्या त्यांनी काव्य फुले बावन कशी. सुबोध रत्नाकर इत्यादी साहित्य लिहिले.
१८९६-९७ सालांदरम्यान पुणे परिसरात प्लेगची साथ पसरली होती. हा जीवघेणा आजार अनेकांचे जीव घेऊ लागला.या प्लेटच्या साथीमध्ये अनेक लोकांचे हाल व जीव जाऊ लागला. यातून उद्भवणारे हाल ओळखून सावित्रीबाईंनी प्लेगपीडितांसाठी पुण्याजवळ वसलेल्या ससाणे यांच्या माळावर दवाखाना सुरू केला. त्या रोग्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना आधार देऊ लागल्या. या दरमयान सावित्रीबाई फुले यांचे १० मार्च १८९७ रोजी निधन झाले.
अशा स्त्री मुक्ती आंदोलनाच्या खऱ्या अग्रणी माता सावित्रीबाईस विनम्र अभिवादन....
" स्त्रियांच्या जीवनी होता अज्ञानाचा अंधार ,क्रांति ज्योती तुम्ही दाविला ज्ञानाचा प्रकाश !स्त्री शिक्षणाची ज्योत पेठवून केला उद्धार,झेप घेण्या उंच खुले करून दिले आकाश !!"
तरी हे होते सावित्रीबाई फुले यांच्यावर मराठी भाषण savitribai phule speech in Marathi तुम्हाला हे भाषण कसे वाटले हे कळविण्याकरिता खाली कमेंट करा जर तुम्हाला हे savitribai phule bhashan Marathi PDF भाषण आवडले असेल तर तुम्ही हे आपल्या मित्र-मैत्रिणीबरोबर नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांच्या सुद्धा मदत होईल
1 टिप्पण्या
Khup chan bhashan dile
उत्तर द्याहटवा