राजमाता जिजाऊ जयंती भाषण मराठी | Rajmata jijau jayanti speech in Marathi 2024 | rajmata jijau jayanti bhashan Marathi
राजमाता जिजाऊ जयंती मराठी भाषण | Rajmata jijau jayanti speech in Marathi: स्वराज्याचे स्वप्न बघणाऱ्या आणि फक्त बघणाऱ्याच नाही तर ते सत्यात देखील उतरवणाऱ्या, राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ यांचा 12 जानेवारी हा जन्मदिवस
राजमाता जिजाऊ यांनी स्वराज्याचे स्वप्न बघितलं आणि ते स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांनी सत्यात उतरवलं, जर जिजामाता नसत्या तर कदाचित हिंदवी स्वराज्य निर्माण होऊ शकलं नसतं.
12 जानेवारी हा दिवस अख्ख्या महाराष्ट्राला लाभलेला सोनेरी दिवस आहे.या दिवशी राजमाता जिजाऊ यांची जयंती ,राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्यांना व त्यांच्या कार्याला अभिवादन केले जाते.
माँसाहेब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त शाळा व महाविद्यालयांमध्ये Rajmata jijau jayanti speech in Marathi भाषण घेतले जाते. म्हणून अनेक विद्यार्थी राजमाता जिजाऊ जयंती मराठी भाषण याची तयारी करत असतात.अशा विद्यार्थ्यांसाठी आज या लेखामध्ये आम्ही राजमाता जिजाऊ जयंती निमित्त भाषण घेऊन आलेलो आहोत.
राजमाता जिजाऊ जयंती भाषण मराठी हे भाषण वर्ग पाच ते दहा आपल्या rajmata jijau jayanti bhashan Marathi. भाषणामध्ये याचा उपयोग करू शकता. किंवा या भाषणाचा वापर वापर करून आपल्या शब्दांमध्ये भाषण तयार करू शकता तर चला मग बघू या राजमाता जिजाऊ जयंती भाषण मराठी मध्ये
राजमाता जिजाऊ जयंती मराठी | Rajmata jijau jayanti speech in Marathi 2024 | rajmata jijau jayanti bhashan Marathi.
राजमाता जिजाऊ भाषण मराठी rajmata jijau speech in Marathi |
सन्माननीय,सन्माननीय व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे वंदनीय गुरुवर्य आणि माझ्या वर्ग मित्र आणि मैत्रिणींनो. आज स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ यांची जयंती या जयंतीनिमित्त आपण सर्वजण येथे जमलेलो आहोत त्यानिमित्त मी तुम्हाला दोन शब्द सांगते ते तुम्ही शांततेने ऐकावे.
जिजाऊ तुम्ही नसता तर, नसते झाले शिवराय नी शंभूछावा....!जिजाऊ तुम्ही नसता तर, नसता मिळाला स्वराज्य ठेवा.....!जिजाऊ तुम्ही नसता तर, नुसते लढले मावळे.....!जिजाऊ तुम्ही नसता तर, नसते दिसले विजयाचे सोहळे.....!
राजमाता, स्वराज्यजननी माँसाहेब जिजाऊ यांच्या कार्याबद्दल माहिती नाही असा एकही माणूस आज आपल्याला सापडणार नाही त्यांनी स्वराज्याचे स्वप्न बघितले आणि फक्त बघितलेच नाही, तर ते सत्यात देखील उतरवले.
आई ही जगातील सर्वात महान योद्धा आहे. आई म्हणजे प्रेम, आपुलकी द प्रेरणा संयम आणि सामर्थ्य यांचा संगम आणि या सर्व गुणांचा सुंदर संगम म्हणजे स्वराज्य जननी बाई शहाजीराजे भोसले. माँसाहेबांचा उल्लेख करताना कुठल्याही संदर्भाची गरज पडत नाही.
अशा या शूर पराक्रमी जिजामाता, (राजमाता जिजाऊ) यांचा जन्म जानेवारी १२ इ.स. १५९८ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे झाला.सिंदखेडचे लखुजी जाधव हे जिजाबाईंचे वडील व आईचे नाव म्हाळसाबाई होते. जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते.
शहाजीराजे भोसले हे वेरूळ येथील मालोजी भोसले यांचे पुत्र होय. जिजाबाईंचा शहाजीराजांशी दौलताबाद येथे विवाह डिसेंबर इ.स. १६०५ मध्ये झाला.
निजामशाही आदिलशाही आणि मुघलांच्या सततच्या वाऱ्यामुळे महाराष्ट्रातील परिस्थिती अतिशय भीषण होती. त्यांच्या विरुद्ध एक शब्द काढायची हिम्मत कोणामध्ये नव्हती. या जुलमी सत्तेच्या बंधनातून रयतेची सुटका करावी असे जिजामातांना नेहमी वाटे. अशा बिकट परिस्थिती स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहिले.
19 फेब्रुवारी 1630 रोजी माँसाहेब जिजाऊ यांच्या पोटी पराक्रमी शिवाजी महाराजांचा जन्म झाला.आपल्या पतीचं स्वराज्याचं स्वप्न ज्यांनी पुत्र शिवबाच्या मनात पेरलं. नुसतं पेरलं नाही तर सुसंस्कारांच्या अमृतसिंचनाने ते फुलवलं. फुलवून वाढवलं. त्याला दृष्ट लागू नये म्हणून डोळ्यात तेल घालून जीवापाड जपलं. त्याला नवनवी पानं फुलं दिली.
राजमाता जिजाऊसाहेब यांनी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी छत्रपती शिवराय यांना ज्ञानाच्या दुर्य चरित्र संघटना व पराक्रम अशा राजास व सद्गुणाचे बाळकडू पाजले.प्रत्येक पराक्रमी पुरुषाच्या जीवनाचे ध्येय एकच असते ते म्हणजे पारतंत्र्यात असणाऱ्या लोकांना स्वातंत्र्य मिळवून देणे अशी राजमाता ने शिकवण शिवरायांना दिली होती.
शिवाजीराजे १४ वर्षांचा असताना शहाजीराजांनी त्यांच्या हाती पुण्याची जहागीर सुपूर्त केली. अर्थातच जहागीरीची वहिवाट लावण्याची जबाबदारी जिजाबाईंवर येऊन पडली.
कुशल अधिकाऱ्यांसमवेत जिजाबाई आणि शिवाजी पुण्यात येऊन दाखल झाले.व उद्ध्वस्त झालेले पुणे, दिमाखात वसवून त्याला नावलौकिक प्राप्त करुन दिला जिजाऊंनी.जिजाबाईंनी दिलेल्या या संस्कारांमुळेच शिवाजीराजे घडले. जिजाऊंनी नुसत्या गोष्टीच सांगितल्या नाहीत तर शिवरायांना राजकारणाचे पहिले धडेही दिले.
राजमाता जिजाऊंच्या शिकवणीच्या आणि संस्काराच्या जोरावर छत्रपती शिवरायांनी हजार वर्षाचे गुलामगिरी मोडून काढली आणि राजमाता जिजाऊ यांचे स्वप्न साकार करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.
स्वराज्याच्या कार्यात शिवरायांना अनेक धाडसी मोहिमा कराव्या लागल्या जीव धोक्यात घालावा लागला. पुत्राचा दररोज मृत्युशी चाललेला संघर्ष, उघड्या डोळ्यांनी बघुनही सैरभैर न होता, व चिंतेची साधी रेघही चेहऱ्यावर उमटू न देता, त्यांनी खंबीरपणे स्वराज्याची निगरानी केली.
एवढेच नव्हे तर राजमाता जिजाऊ या आजी झाल्यावर.
निवृत्तांसारखं न बसता, नातू शंभूराजांच्या मनातही अंत:करणाची पेरणी करून, स्वराज्याभिमानाचं असं स्फुलिंग चेतविलं,! तीन पीढ्यांना स्वराज्याच्या ध्यासाने प्रेरित करणारी अशी राजमाता होती.
रयतेसाठी लढ पोरा, रयतेसाठी लढ पोरा,असत्या आईचा आवर्त होता, ती आई म्हणजे राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ.दगडालाही फुटेल पाझर,शब्दांमध्ये तेवढा प्रभाव पाहिजे,दगडालाही फुटेल पाझर,शब्दांमध्ये तेवढा प्रभाव पाहिजे,पुन्हा या महाराष्ट्राला,जिजाऊंच्याच विचारांचा लढा पाहिजे,जिजाऊंच्याच विचारांचा लढा पाहिजे,
एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो
जय जिजाऊ जय शिवाजी जय महाराष्ट्र जय हिंद जय भारत.
धन्यवाद.
तर हे होते राजमाता जिजाऊ जयंती भाषण मराठीमध्ये. तुम्ही राजमाता जिजाऊ जयंती भाषणाचा आपल्या Rajmata jijau jayanti speech in Marathi 2024 भाषणामध्ये याचा उपयोग करू शकता.तुम्हाला राजमाता जिजाऊ भाषण कसे वाटले हे कळवण्याकरिता खाली कमेंट करा.
जर तुम्हाला rajmata jijau jayanti bhashan Marathi.हे भाषण आवडले असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणीबरोबर नक्की शेअर करा जेणेकरून त्यांची सुद्धा मदत होईल जर या भाषणामध्ये काही चूक आढळून आल्यास व आम्हाला आपल्याकडील अधिक माहिती देण्याकरिता तर कमेंट मध्ये कळून नक्की कळवा धन्यवाद.
0 टिप्पण्या