धम्मचक्र प्रवर्तन दिन 2022 माहिती मराठी | dhamma chakra pravartan din information in marathi

धम्मचक्र प्रवर्तन दिन माहिती मराठी | धम्म चक्र प्रवर्तन दिवस | Dhammachakra Pravartan Din 2022 Marathi information 

धम्मचक्र प्रवर्तन दिन 2022 माहिती मराठी  | dhamma chakra pravartan din information in marathi
धम्म चक्र प्रवर्तन दिवस 2022 | Dhammachakra Pravartan Din 2022


Dhammachakra Pravartan Din 2022 Marathi: सर्वप्रथम धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 

नमस्कार आजच्या या लेखामध्ये आज आपण धम्मचक्र प्रवर्तन दिन याविषयी माहिती बघणार आहोत तसेच धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा,बॅनर, हे सुद्धा बघणार आहोत तर चला मग माहिती बघूया धम्मचक्र प्रवर्तन दिनाविषयी.

धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणजेच अशोक विजयादशमी हा बौद्ध धर्मासाठी महत्त्वाच्या सणा पैकी एक सण आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिन दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.

धम्मचक्र प्रवर्तन दिन का साजरा केला जातो तर या या दिवशी तीन महत्त्वाच्या घटना घडल्या होत्या. त्या महत्त्वाच्या घटना पुढील प्रमाणे.

धम्म चक्र प्रवर्तन दिवस 2022 | Dhammachakra Pravartan Din 2022

बोधिसत्व सिद्धार्थ गौतम नवीन प्रकाशाच्या शोधात असताना बोधिसत्व सिद्धार्थ गौतम आणि सहा वर्षे खडतर तपश्चर्या केली तरी सुद्धा त्यांना नवीन प्रकाश दिसला नव्हता.

एखादा मार्ग सापडेल अशी सिद्धार्थाला नेहमी आशा वाटत  असे, आशा आणि निश्चय यांच्यामुळे धीर येऊन ते उरवेला सोडून बुद्धगया येथे आले.

बुद्धगया येथे आल्यानंतर त्यांनी तिथे एक पिंपळ वृक्ष पाहिले. व आपल्याला नवा प्रकाश दिसेल या आशेने ते चिंतन करण्यासाठी बुद्धगया येथील पिंपळवृक्षाखाली ते बसले.

चार आठवडे चिंतन करी ज्ञान मग्न राहावे लागले व चार पायऱ्यांनी त्यांनी संपूर्ण ज्ञान प्राप्त करून घेतले. त्यांना नवीन मार्ग सापडला अंधकार नाहीसा होऊन प्रकाशाचा उदय झाला.

त्यांना जे ज्ञान प्राप्त झालं ते सामान्य माणसांना समजण्यासाठी कठीण होतं. ते तत्व मान्य करणे व त्याचे अनुकरण करणे अत्यंत कठीण आहे.

बुद्धिमान लोकांनाही ते सहजासहजी कळणार नाही म्हणून त्यांनी त्या ज्ञानाचा उपयोग स्वतःसाठी करायचा ठरवला होता.

भगवान बुद्धांच्या मनातील विचार ब्रह्म सहपतीने ओळखले व व भगवान बुद्धांना त्यांनी हात जोडून विनंती केली.
आपले हे ज्ञान जगाला अंधकारातून मुक्त करण्यासाठी आहे त्यामुळे मानव जातीचे रक्षण होईल,त्यामुळे तुम्ही आपले ज्ञान सर्वांना द्यावे ही विनंती केल्यावर भगवान बुद्धांनी ते मान्य केले.

व धम्माचा उपदेश आपले ज्ञान कोणाला सांगावे तेव्हा त्यांना आलारकालाम यांची आठवण झाली. पण ते मरण पावले होते नंतर त्यांना उदक्कराम पुत्ताची आठवण झाली. पण तोही मरण पावला होता.

त्यानंतर त्यांना जुन्या पाच परिव्राजक सोबत्यांची आठवण झाली. व त्यांनी धम्माचा उपदेश देण्याचे ठरवले त्यावेळी ते परिव्राजक सारनाथला इसीपतन मृगदायक वनात होते.

भगवान बुद्ध गेले व त्या पाच परिव्राजकाला आपल्या धम्माचा उपदेश दिला हे पहिले धम्मचक्र प्रवर्तन भगवान बुद्धांनी केले व अशाप्रकारे भगवान बुद्धांचा धम्म जगामध्ये उदयास आला.अशाप्रकारे पहिले  धम्मचक्र प्रवर्तन भगवान बुद्धांनी केले.

इ.स.पूर्व तिसरे शतक हा सम्राट अशोक यांचा उदयकाळ! एका साम्राज्याचा वारसा लाभलेल्या अतिमहत्त्वाकांक्षी राजा अशोक यांनी अनेक राज्ये काबीज केली आणि आपले अफाट साम्राज्य स्थापित केले.

सम्राट अशोक हा महान युद्ध होता संपूर्ण राज्यावर अशोकाचे साम्राज्य होते, जसे की  कंदहार,काबुल, हीरात व बलुचिस्तान, सिंधू नदीच्या पलीकडील ग्रीक प्रदेश हिमालय पर्वताला लागून असलेली नेपाळची भूमी व व उत्तर पूर्व बंगालचा प्रदेशाचा भाग सुद्धा  ब्रह्मदेशापर्यंत इतके अफाट साम्राज्य त्याच्याजवळ होते.

फक्त कलिंग राज्य हे स्वतंत्र राज्य होते ते त्याच्याकडे नव्हते ते राज्य जिंकण्यासाठी कलिंग राज्यावर इसवी सन पूर्व 261 मध्ये त्यांनी आक्रमण केले.

व कलिंग राज्य त्यांनी जिंकून घेतले. या युद्धामध्ये खूप मनुष्यांची जीवित हानी झाली. यामध्ये अशोकाने दीड लाख सैन्य कैद केले व एक लाख लोकांना ठार मारण्यात आले होते. व लाखो लोक जखमी होते.

जिकडे पाहावे तिकडे रक्त पास झाला रक्ताचा पूर वाहू लागला होता हे दृश्य पाहून सम्राट अशोक फार दुःखी झाला त्याच्या मनाला फार यातना होत होत्या त्यांनी युद्ध जिंकले होते पण त्याचे मन कशातही रमत नव्हते.

एक दिवशी शिरमन निग्रोध शांतमुद्रेने अशोकाच्या महाला समोरून चालला होता. तेव्हा अशोकाने त्या श्रमनाला पाहिले,त्या श्रमनाला पाहून सम्राट त्याच्याकडे आकर्षित झाला त्यानंतर सम्राटाने त्या श्रवण भिकूला घरी बोलावले सम्राट आणि काही प्रश्न विचारले मग निग्रोध श्रमनाने धम्मपदातील अप्पामाद वग्ग हा उपदेश दिला.

हा उपदेश एकूण अशोकाने बौद्ध धम्माची दीक्षा घेण्याच्या संकल्प केला. यानंतर सम्राट अशोकाने आपल्या परिवारासह घरगुती समारंभ आयोजित करून बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. व त्यांनी प्रतिज्ञा केली की आजपासून शस्त्राचा त्याग करतो व बुद्धाच्या शांती अहिंसेचा मार्ग स्वीकारतो.

मी आजपासून शास्त्राद्वारे विजय प्राप्त करणार नाही तर शांती व अहिंसेद्वारा विजय प्राप्त करील.ज्या दिवशी अशोकाने प्रतिज्ञा केली तो दिवस हा दशमीचा दिवस होता. अशोकाचा विजयाचा दिवस होता तेव्हापासून अशोक विजयादशमी साजरी करण्यात येते.

अशोकाने बौद्ध धम्माची दीक्षा घेतली व संपूर्ण जंबूदीप बौद्धमय केलं. सम्राट अशोकाने 84 हजार लेण्या तयार केल्या व 84 हजार स्तूप बांधले.अशाप्रकारे सम्राट अशोकाने धम्मचक्र प्रवर्तन केले.

त्यानंतर तिसऱ्यांदा बाबासाहेबांनी धम्मचक्र प्रवर्तन केले.
बाबासाहेबांनी 13 ऑक्टोबर 1935 नाशिक मधील येवला येथे घोषणा केली होती मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही आणि ही बाबासाहेबांची प्रतिज्ञा बाबासाहेबांनी पूर्ण केली.

त्यासाठी बाबासाहेबांनी संपूर्ण धर्माचा अभ्यास केला पण बाबासाहेबांवर लहानपणापासून बुद्धांच्या संपूर्ण विचारांचा प्रभाव होता.

कारण बुद्धाचा तत्त्वज्ञान हे मानव जातीच्या कल्याणाचे आहे त्यामुळे त्यांनी बौद्ध धम्माची दीक्षा  घेण्याचे ठरवले. व त्यांनी 14 ऑक्टोबर 1956 ला नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर स्वतः भंते चंद्रमणी बोधी यांच्याकडून दीक्षा घेतली व नंतर बाबासाहेबांनी आपल्या पाच कोटी अनुयायांना त्रिसरण पंचशील व 22 प्रतिज्ञा देऊन बौद्ध धम्माची दीक्षा दिली.

तो दिवस सुद्धा विजय दशमीचा होता हे सर्वात मोठे ऐतिहासिक असे धम्मचक्र प्रवर्तन होते.बाबासाहेबांनी जे बोलले ते करून दाखविले कारण बाबासाहेब हे बोधिसत्व होते. त्या बोधिसत्व बाबासाहेब यांना दरवर्षी आपण लाखो संख्येने दीक्षाभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी जात असतो. अशा महामानवास कोटी कोटी अभिवादन.

तुम्हा सर्वांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
तर ही होती धम्मचक्र प्रवर्तन माहिती ही माहिती अनेक लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता खाली शेअर बटनवर क्लिक करून शेअर करा. आणि तुम्ही धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यास नागपूरला जाता की नाही हे हे सांगण्याकरिता काली कमेंट करा.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या