मराठी राजभाषा दिन बातमी लेखन | marathi bhasha diwas batmi lekhan in marathi

 मराठी राजभाषा दिन बातमी लेखन | marathi bhasha diwas batmi lekhan in marathi 

नमस्कार आजच्या लेखात आज आपण उपयोजित लेखन यामधील बातमी लेखन प्रकारातील एक कृती बघणार आहोत. म्हणजेच बातमी लेखन प्रकारातील आज एक आपण उदाहरण बघणार आहोत. आजच्या लेखात आज आपण मराठी भाषा दिवस बातमी लेखन, मराठी दिवस बातमी लेखन. म्हणजेच मराठी राजभाषा वृत्तांत लेखन बघणार आहोत.

तर चला मग सुरु करूया मराठी राजभाषा बातमी लेखन मराठी.marathi bhasha diwas batmi lekhan in marathi तुम्हाला या मध्ये  खालील प्रमाणे प्रश्न दिले जाईल त्यावर तुम्हाला बातमी लेखन तयार करायची आहे.

मराठी राजभाषा दिन बातमी लेखन | marathi bhasha diwas batmi lekhan
मराठी राजभाषा दिन बातमी लेखन | marathi bhasha diwas batmi lekhan


मराठी राजभाषा दिन बातमी लेखन | marathi bhasha diwas batmi lekhan in marathi 


प्रश्न: तुमच्या शाळेत मराठी भाषा दिन उत्साहात साजरा झाला या विषयावर बातमी लेखन तयार करा.marathi rajbhasha din batmi lekhan

शिवाजी विद्यालयात मराठी भाषा दिन जल्लोषात साजरा

आमच्या प्रमुख प्रतिनिधी कडून / वार्ताहर कडून

मुंबई 28 फेब्रुवारी : श्री शिवाजी विद्यालयात 27 फेब्रुवारी रोजी मराठी राजभाषा दिवस म्हणजेच मराठी भाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 27 फेब्रुवारी हा दिवस म्हणजे प्रसिद्ध ज्येष्ठ लेखक,कवी,कादंबरीकार विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस. कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी दरवर्षी मराठी भाषा दिन म्हणजेच मराठी राजभाषा दिवस साजरा केल्या जातो.

कुसुमाग्रज यांची जयंती तसेच मराठी राज्यभाषा दिवस याचे औचित्य साधून श्री शिवाजी विद्यालयात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शहरातील प्रसिद्ध लेखक व कवी श्री नादु मांगुळकर (नाव काल्पनिक) लाभले होते. 

कार्यक्रमाची सुरुवात कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व विद्यालयातील वर्ग 10 च्या विद्यार्थिनींनी गायलेल्या स्वागत गीताने झाली.
त्यावेळी मंच्यावर कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे, संस्थाअध्यक्ष,शाळेचे मुख्याध्यापक, सचिव इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमांमध्ये पुढे शाळेच्या मुख्याध्यापकांनी कार्यक्रमाची प्रस्तावना तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पर भाषण केले. या भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषेचा इतिहास, मराठी भाषेतील विविध महान ग्रंथ व कवी यांच्या बद्दल माहिती सांगितली.आणि आपल्या दैनंदिन जीवनात मोठ्या प्रमाणात जास्तीत जास्त मराठी भाषेचा वापर करण्याचे आवाहन केले.

यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांनी आपले वक्तृत्व केले.त्यांची वक्तृत्वाची कला पाहून संपूर्ण सभा मंडप भारावून गेला होता. मराठी भाषा ही आपली माता आहे. मराठी भाषेला अधिकाधिक संपन्न  करण्यासाठी व तिच्या समृद्धीसाठी ज्या साहित्यिक महात्म्यांनी आपले जीवन व्यतीत केले. त्यांच्याबद्दल आपण ऋणी असले पाहिजे असे संदेश दिला.व तसेच प्रत्येकाने मराठी भाषेतील साहित्याचा अभ्यास करून तिची किर्ति जगामध्ये दुरवर पसरली पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमांमध्ये मराठी भाषा या दिनानिमित्त मराठी भाषेचे महत्व यावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम पण आयोजित करण्यात आले होते.
स्पर्धेमध्ये सर्वोत्तम स्पर्धकाला मंचावरील मान्यवर द्वारे बक्षीस वितरण करण्यात आले. विद्यालयातील वरिष्ठ शिक्षिका श्रीमती नूतन गाडेकर (नाव काल्पनिक) यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करून अध्यक्षांच्या वतीने कार्यक्रम संपला असे जाहीर केले.

समाप्त

मराठी भाषा दिन वृत्तांत लेखन

तर हे होते  मराठी राजभाषा दिवस बातमी लेखन. मराठी दिन बातमी लेखन वृत्तांतलेखन. marathi rajbhasha din batmi lekhan तुम्ही आपल्या अभ्यासासाठी वर्ग 8 ते 10 चे विद्यार्थी वापरू शकता. हे बातमी लेखन तुम्हाला कसे वाटले हे सांगण्याकरिता खाली कमेंट करा.आणि आणखी कोणत्या विषयावर तुम्हाला बातमी लेखन हवी असेल तर याबद्दल तुम्ही नक्की खाली कामं बद्दल सांगा त्यावर तुम्हाला आम्ही बातमी लेखन लिहून देण्याचा प्रयत्न करू. जर तुम्हाला बातमी लेखन आवडले असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर नक्की शेअर करा.


हे सुद्धा वाचा 



टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या