२६ जानेवारी भाषण मराठी 2024 | 26 january speech in marathi | Republic Day Speech In Marathi

26 जानेवारी' प्रजासत्ताक दिन भाषण मराठी | 26 January bhashan marathi | prajasattak din marathi bhashan | 26 jan marathi speech 


Republic Day Speech In Marathi:नमस्कार मित्रांनो आजच्या लेखात आज आपण 26 जानेवारी मराठी भाषण 26 january speech in marathi म्हणजेच प्रजासत्ताक दिनावर भाषण बघणार  आहोत, 26 जानेवारी मराठी भाषण या भाषणाचा  वर्ग 1 ते 10 चे विद्यार्थी आपल्या भाषणामध्ये याचा उपयोग करू शकतात. तसेच हे 26 जानेवारी भाषण मराठी लहान मुलांसाठी  सुद्धा उपयोगी आहे चला तर प्रजासत्ताक दिनाच्या मराठीत भाषणाला सुरवात करूया .26 jan marathi speech 

'26 जानेवारी' प्रजासत्ताक दिन 'भाषण' मराठी | 26 January bhashan marathi PDF Download | prajasattak din marathi bhashan
26 January speech in marathi

26 जानेवारी भाषण मराठी | 26 January bhashan marathi | 26 january speech in marathi for small child | prajasattak din marathi bhashan 


प्रजासत्ताक दिनाच्या भाषांनाला सुरवात 
प्रजासत्ताक दिन चारोळ्या
घटनाकार व स्वातंत्र्य वीरांचे करुणी स्मरण! 
साजरा करूया प्रजासत्ताक दिन
साजरा करूया प्रजासत्ताक दिन!!


२६ जानेवारी  भाषण मराठी | 26 january speech in marathi | Republic Day Speech In Marathi | प्रजासत्ताक दिन भाषण मराठी 2023

सन्माननीय व्यासपीठ व व्यासपीठावरील आदरणीय प्रमुख पाहुणे आदरणीय शिक्षक व माझ्या प्रिय वर्ग मित्र-मैत्रिणींनो,

आज आपण आपल्या शाळेच्या प्रांगणात प्रजासत्ताक दिन साजरा करण्याचा साठी जमलो आहे.आजच्या 74 व्या प्रजासत्ताक दिनी मी तुम्हा सर्वांना खूप खूप मनःपूर्वक शुभेच्छा देते व भाषणाला सुरुवात करते.

२६ जानेवारी हा भारताचा "प्रजासत्ताक दिन" आहे. तो राष्ट्रीय सन आहे. त्याबाबत प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. म्हणूनच भारतातील प्रत्येक वाडी-वस्ती, गाव, विभाग, मोहल्ला, तालुका, जिल्हा, शहर, राज्य, आणि राष्ट्रात सर्वत्र प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला वंदन केले जाते.

जसे की आपणा सर्वांना माहितच आहे आपला भारत देश हा 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिश राजवटीपासून मुक्त झाला अर्थात स्वतंत्र झाला पण भारतीयांना संपूर्ण स्वातंत्र्य हे संविधान लागू झाल्यापासून मिळालं .

२६ जानेवारी १९५० रोजी भारत देश प्रजासत्ताक झाला. म्हणजे काय झाले? तर त्या दिवसापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या व भारत देशाला अर्पण केलेल्या संविधानानुसार देशाचा राज्यकारभार सुरु झाला. म्हणजेच संविधानाची अंमलबजावणी "२६ जानेवारी" पासून सुरु झाली. त्यालाच"प्रजासत्ताक दिन" असे म्हणतात.

26 जानेवारी 1950 रोजी भारताने राज्यघटना लागू केली भारतीय राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अथक परिश्रमाने, मेहनतीने, राष्ट्राचे हित डोळ्यासमोर ठेवून आपल्या प्रकृतीची तमा न बाळगता दोन वर्षे 11 महिने 18 दिवस एवढ्या कालावधीत अत्यंत जबाबदारीने पूर्ण केली. 

आपल्या देशाचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. आपले भारतीय संविधान हे स्वातंत्र्य समता बंधुता न्याय व एकता या तत्वावर आधारित आहे. भारत देशाची राज्यघटना लागू झाल्यापासून खरी लोकशाही देशामध्ये नांदू लागली. 

आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी स्वातंत्र्यसैनिकांनी खूप हाल अपेष्टा सहन केल्या स्वातंत्र्यासाठी लढा द्यायला ते नेहमी तत्पर असतात त्यांना आपण स्मरण करूया व त्यांना वीर सलामी देऊया.

 प्रजासत्ताक दिना विषयी आणखी बोलायचं म्हणजे प्रजासत्ताक दिनाचा खरा मानकरी संविधान आहे. संविधानामुळेच भारतीयांना आपल्या हक्काच्या लढ्यासाठी बळ मिळाले. गोरगरिबांना पासून श्रीमंता पर्यंत प्रत्येकाला समान अधिकार हे संविधानामुळे मिळाले. 

प्रत्येकासाठी कायदा हा सन्मान आहे संविधानामुळेच आपल्याला शिक्षणाचा अधिकार मतदानाचा अधिकार भाषा भाषण करण्याचा अधिकार आणि विचार अभिव्यक्ती करण्याचा अधिकार तसेच कित्येक अधिकार प्राप्त झाले.

स्वातंत्र्यदिनी ज्या प्रमाणे देशाला स्वातंत्र मिळवून देणार्‍या स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाचा गौरव होतो , त्याच प्रमाणे प्रजासत्ताक दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान निर्मितीचा गौरव होणे उचित ठरते.

धन्य धन्य ते संविधान व महान परम पूज्य संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी धन्यवाद देतो. शेवटी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय भारत

प्रजासत्ताक दिन चारोळ्या

चला साजरे करूया 

आपल्या सविधांनाचा आदर ,

ज्याने दिला जगण्याचा आणि शिकण्याचा अधिकार !!

समाप्त  

तर हे होते Republic Day Speech In Marathi,26 jan marathi speech   '२६ जानेवारी' प्रजासत्ताक दिन 'भाषण' मराठी | 26 january speech in marathi 2024 तुम्हाला हे भाषण कसे वाटले या बद्दल कमेन्ट मध्ये नक्की कळवा 


प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | republic day wishes in marathi| 26 january 2023 wishes in marathi 

शिवाजी महाराज भाषण मराठी | shivaji maharaj bhashan marathi 

महात्मा गांधी जयंती भाषण mahatma gandhi speech in marathi

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या