plastic bandi batmi lekhan in marathi:नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आज आपण उपयोजित लेखन यामधील बातमी लेखन यावर एक उदाहरण बघणार आहोत. बातमी लेखन मराठी मध्ये आज आपण प्लास्टिक बंदी यावर बातमी तयार करणार आहोत.ह्या पोस्ट मध्ये तुम्हाला प्लास्टिक बंदी वर बातमी लेखन कसे करावे याबद्दल सविस्तर सांगण्यात आलेले आहे यामध्ये तुम्हाला दोन बातमी लेखन करून दाखवण्यात आली आहे.
तुम्हाला प्रश्न पत्रिका मध्ये राज्य सरकारने शहरात प्लास्टिक बंदी लागू केली किंवा शहरात झालेल्या प्लास्टिक बंदी वर बातमी लेखन तयार करा असा प्रश्न विचारला किंवा दिल्या जाईल.त्यावर तुम्हाला तुमच्या मताने योग्य योग्य पद्धतीने व सुटसुटीत कमी शब्दात उत्तम अशी बातमी लेखन तयार करायची आहे. तर चला बघूया प्लास्टिक बंदी बातमी लेखन मराठी | plastic bandi batmi lekhan in marathi
प्लास्टिक बंदी बातमी लेखन मराठी | plastic bandi batmi lekhan in marathi |
प्लास्टिक बंदी बातमी लेखन मराठी | plastic bandi batmi lekhan in marathi
मुंबई दिनांक 14 फेब्रुवारी 2019 म्हणजेच काल राज्य सरकारने सर्व राज्यभरात प्लास्टिक बंदी लागू केल्याची घोषणा केली. कचरा एक मोठी समस्या आहे. ती पर्यावरणाला हानी आणि शहराला विद्रूप करण्याचे काम करते. प्लॅस्टिकचा कचरा नष्ट करणे शक्य नसल्याने दिवसेंदिवस प्लास्टिकच्या कचऱ्याचे ठीक दिवसेंदिवस वाढत चालले आहे.
सरकारच्या या प्लास्टिक बंदीचा निर्णय आणि काही जनतेने स्वागत केले आहे.त्यांचे असे म्हणणे आहे की पर्यावरणातील वाढत्या अविघटनशील प्लास्टिकचा कचरा आणि त्यापासून होणार्या निरनिराळ्या आजारांना या निर्णयामुळे आळा बसेल तसेच प्लॅस्टिक जी पर्यावरणाला आणि होते. ती सुद्धा काही प्रमाणात आटोक्यात येईल.
पण दुसरीकडे व्यापारी वर्गाने हा निर्णय ऐकताच नाराजीचा सूर काढलेला आहे.त्यांचे म्हणणे असे आहे की प्लास्टिकला कोणतेही पर्याय न देता असा हा सरकारचा तडकाफडकी निर्णय घेणे हा जर आमच्यावर अन्याय आहे.आणि आमच्या जवळ असलेल्या प्लास्टिक पिशव्यांचे आम्ही काय करावे हा प्रश्न सुद्धा त्यांनी विचारलेला आहे.या सर्व प्रतिक्रिया आमच्या वार्ताहराने सामान्य जनते कडून व व्यापारी वर्ग कडून जाणून घेतल्या.
समाप्त
आमच्या वार्ताहरकडून दिनांक 30 डिसेंबर 2019
पुणे 29 डिसेंबर 2019 प्लॅस्टिकच्या वाढत्या प्रदूषणामुळे आणि त्याच्या मुळे मानवी आरोग्यावर होत असलेल्या परिणामामुळे राज्य सरकारने एक घोषणा केली आहे आता राज्यात प्लास्टिक पिशवीच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. वापरकर्ता कडे प्लॅस्टिकची पिशवी आढळल्यास त्यांच्या कडून पाच हजार रुपये दंड आकारला जाईल. अशीसुद्धा घोषणा करण्यात आली आहे.
आमच्या प्रतिनिधींनी याबाबत काही नागरिकांची भेट घेतली व त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला काही नागरिकांनी याबद्दल आनंद व्यक्त केला आणि या निर्णयाचे स्वागत केले या निर्णयामुळे पर्यावरणातील प्रदूषण कमी होईल आणि प्लॅस्टिकच्या कचऱ्याला आळा बसेल असे त्यांचे म्हणणे दिसून आले. तर व्यापारी वर्गाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. प्लास्टिक ला कोणताही पर्याय न देता. हा निर्णय घेण्यात आल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागेल. असे त्यांचे म्हणणे दिसून आले.
तर होते प्लास्टिक बंदी बातमी लेखन मराठी मराठी मध्ये..यामध्ये तुम्ही बदल करून आपल्या सोयीनुसार बातमी लेखन तयार करू शकता.जर तुम्हाला plastic bandi batmi lekhan in marathi ही बातमी लेखन आवडले असेलआणि जर काही प्रश्न असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये नक्की विचारा आम्ही त्याचे उत्तर नक्की देण्याचा प्रयत्न करून.आणि हि पोस्ट आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा मदत होईल.
- नक्की वाचा : batmi lekhan in marathi
0 टिप्पण्या