माझे गाव मराठी निबंध | maze gaon marathi nibandh

 माझे गाव मराठी निबंध | maze gaon marathi in nibandh 

माझे गाव मराठी निबंध | maze gaon marathi in nibandh: गाव म्हणजे प्रत्येकाच्या आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. जेव्हा परीक्षा संपून उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागतात तेव्हा प्रत्येक जण हा आपल्या मामाच्या गावाकडे जातो. तसेच दिवाळी च्या सुट्टीत पण आपण गावी जात असतो.

माझे गाव मराठी निबंध | maze gaon marathi in nibandh
माझे गाव मराठी निबंध | maze gaon marathi in nibandh

नमस्कार मित्रांनो सुरुवातीच्या या उताऱ्यावरून तुम्हाला कळलेच असेल की आज आपण या पोस्टमध्ये माझे गाव maza gaon nibandh या वर निबंध लेखन मराठी बघणार आहोत माझे गाव my village essay in marathi  या निबंधामध्ये एका खेडे गावाचे अतिशय सुंदर पद्धतीने वर्णन करण्यात आले आहे.आणि सोबतच तेथील परिस्थिती, वातावरण,सामाजिक व्यवस्था याचेसुद्धा वर्णन घ्या निबंधामध्ये करण्यात आले आहेत तर त्यांना मग सुरु करूया माझे गाव निबंध.maza gaon essay in marathi

माझे गाव मराठी निबंध | maze gaon marathi nibandh

माझा गाव निबंध maza gaon nibandh:माझ्या गावाचे नाव हे कात्री आहे.कात्री हे गाव यवतमाळ जिल्हा पासून सुमारे तीस किलोमीटर अंतरावर आणि राळेगाव पासून 15किलोमीटर अंतरावर वसलेले एक छोटेसे गाव आहे.माझे गाव कात्री हे मुख्य रोडला लागूनच वसलेले आहे.गावाची सुरुवात ही लाल परी च्या छोट्या श्या. पण आकर्षक अश्या बसस्थानकाने होते.

माझे गाव एक छोटेसे गाव आहे गावात सुमारे 300 ते 500 घरे आहेत. जास्त करून गावात जुन्या पद्धतीचे पण मजबूत असे घरी आहे पण गावांमध्ये दिवसेंदिवस आता हळूहळू प्रगती होत असल्याने गावामध्ये एक - दोन मोठ्या इमारती पण बघायला मिळतात.


गावातील नैसर्गिक वातावरण | माझे गाव मराठी निबंध | maze gaon marathi in nibandh

गावातील वातावरण हे एकदम शुद्ध आणि आनंदित वातावरण आहे. गावात सगळीकडे हिरवळ पसरलेली आहे. रस्त्याच्या दोन्ही कडेला कडुनिंब,पळस,पिंपळ इत्यादींचे मोठमोठाले वृक्ष बघायला मिळतात. गावात मोठ्या प्रमाणात वनसंपत्ती असल्याने व वाहनांची संख्या कमी असल्याने गावात प्रदूषणाचे प्रमाण नसल्यासारखेच आहे.गावात किंवा गावाजवळ कोणतीही फॅक्टरी अथवा कारखाना नसल्यामुळे गावातील हवा प्रदूषण विरहित व शुद्ध आहे.

गावातील लोकांमधील सर्व धर्म समभाव

माझ्या गावात प्रत्येक जाती धर्माचे पंताचे लोक राहतात. सर्व गावात अगदी खेळीमेळीचे व आनंदाचे वातावरण असते. गावात श्रीमंत-गरीब असा भेदभाव होत नाही,गावातील सर्व धर्माचे लोक मिळून मिसळून आनंदाने राहतात. सर्वजण कोणताही सण असो जसे की दिवाळी, दसरा होळी, पतेती, ईद, गुढीपाडवा पारसी असे सर्व सण प्रत्येक धर्मातील लोक मिळून मिसळून मोठ्या आनंदाने व गुण्यागोविंदाने दरवर्षी साजरे करत असतात.


गावातील शिक्षण व्यवस्था | माझे गाव मराठी निबंध | maze gaon marathi nibandh 

गावात प्राथमिक म्हणजे आठवीपर्यंतची शाळा आहे. तसेच लहान मुलांना अंगणवाडी सुद्धा आहे. आठवीनंतर गावाजवळ तीन किलोमीटर अंतरावर माध्यमिक शाळा आहे गावांमध्ये उत्तम तसेच दर्जेदार शिक्षण दिल्या जाते.
या सोबतच विद्यार्थ्यांना शाळेविषयी आपुलकी निर्माण होण्यासाठी रोज त्यांना एक रुपया आणि मधल्या सुट्टीमध्ये पोस्टीक जेवण म्हणजेच आहार दिला जाते.

आता गावाचे मी इंग्रजी शाळा सुद्धा उभारण्यात आली आहे. शाळेवरून आठवलं कि आमच्या गावात रात्रीची शाळा सुद्धा भरत असते. निरक्षर लोकांना लिहिता वाचता यावं किंवा ज्यांना काही कारणास्तव लहानपणी शाळेत जाताना नाही अशांसाठी रात्रीची शाळा दररोज सार्वजनिक ठिकाणी भरते. रात्रीच्या शाळेला आमच्या गावात उत्तम असा प्रतिसाद आहे.

गावातील लोकांचा व्यवसाय 

गावात सर्व जण शेतीवर व शेतीपूरक व्यवसायावर अवलंबून आहे.गावाला लागूनच सर्वांची मोठमोठ्या शेती आहे सर्वजण नियमित सकाळी लवकर उठून शेतावर आपली बैलगाडी घेऊन निघतात.आणि रात्री परत येतात.सायंकाळी आपल्या शेतावर आली की सर्वजण निंबाच्या झाडाखाली गप्पा मारताना दिसतात. मलासुद्धा बैलगाडीवर बसून राहायला खूप आवडते. मी जेव्हा कधी गावाला जात असतो तेव्हा बैलगाडीवर बसतो.
गावामध्ये शेती असल्याने सर्व प्रकारच्या केमिकल विरहित भाजीपाला सर्वांना उपलब्ध होतो. त्यामुळे गावात रोगराईचे प्रमाण कमी आहे.

गावात स्वच्छतेची घेतली जाणारी काळजी

maze swachh gaon marathi nibandh:आमचे गाव हे जरी खेडेगाव असले तरी तेथे स्वच्छतेची प्रत्येक जण काळजी घेत असते. गावात कुठेही दुर्गंधी बघायला मिळत नाही. दररोज सकाळी आणि सायंकाळी प्रत्येक घरच्या महिला आपल्या घराजवळील परिसर स्वच्छ करतात याशिवाय ग्रामपंचायतीची घंटागाडी सुद्धा नियमित येत असल्याने गावात कोणीही इकडे तिकडे कचरा फेकत नाही. प्रत्येक जण येणाऱ्या त्या घंटागाडीमध्ये आपल्याकडील कचरा टाकतो. याशिवाय बस स्थानक चौकामध्ये मोठ्या कचरापेट्या सुद्धा आहे.गाव हे स्वच्छ गावातल्या आणि गावाला आदर्श गाव आणि हागणदारी मुक्त गाव gandagi mukt maze gav असे सुद्धा पुरस्कार मिळाले आहे.


गावातील संस्कृती

आमच्या कात्री या गावातील लोक धार्मिक तसेच सामाजिक आहे.तेथे सर्वधर्मसमभाव आहे गावात रोज सकाळ संध्याकाळी प्रार्थना होते तसेच प्रत्येक सण आणि महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी देखील मोठ्या उत्साहाने चौकात साजऱ्या केल्या जाता.

गावातील मुख्य आकर्षण

गावातील मुख्य आकर्षण तसे खुप आहे पण. त्यापैकी मला आवडते ते म्हणजे गावात होणारे खटेश्वर बाबांची यात्रा. गावातच बाबांची भव्य असे मोठे मंदिर आहे.दरवर्षी येथे यात्रा भरते यात्रेच्या वेळी तेथे निरनिराळ्या खेळण्याचे खाद्यपदार्थाचे कपड्याचे असे अनेक दुकाने लागतात यात्रेच्या दिवशी अनेक खेड्यापाड्यातून लोक तिथे येत असतात.या दिवशी अनेक लोकांचे स्वयंपाक देखील देवस्थानात असतात. हे भव्य यात्रा पाहायला गावचा प्रत्येक जण यात्रेमध्ये जात असतो.

यानंतर सांगायचं झालं तर गावचे दुसरे महत्त्वाचे मुख्य आकर्षण म्हणजे पाटलाचा जुना वाडा.हा वाडा अतिशय जुना आहे तो इंग्रजांच्या काळातील आहे पण तो आजही तो आपल्या भक्कम अवस्थेत उभा आहे. तो वाडा भव्य आणि दिव्य आहे संपूर्ण वाडा हा खास प्रकारच्या दगडांनी बांधला गेलेला आहे. गावात कोणी आले की त्याचे लक्ष त्या वाड्यावर पडते. या वाड्याला आता सर्वजण गावातील सांस्कृतिक ठेवा म्हणून जतन करतात.


गावातील बाजार

कात्री या गावचा बाजार हप्त्याच्या दर मंगळवारी भरतो या बाजारात सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ, मास, मच्छी, किराणा, तसेच खेळणी कपडे आणि इतर महत्त्वाच्या सर्व प्रकारच्या वस्तू मिळतात. या गावच्या बाजारात सर्वात प्रसिद्ध म्हणजे तेथील मिळणारी जिलेबी होय.


गावात होणारे दिवसेंदिवस होणारे बदल गावाचे बदलते स्वरूप

गावात आता प्रत्येक जण साक्षर होत आहे, आमच्या गावात डिजिटल ग्रामपंचायत या सोबतच सर्व शाळा मध्ये कम्प्युटर आले आहे.सर्व गावात नळ तसेच डांबरी व सिमेंटचे रस्ते व रस्त्याच्या कडेला लाईट आता लागलेले आहे. मुलांना आता उच्च प्रकारचे शिक्षण सुद्धा मिळत आहे दिवसेंदिवस गावाची प्रगती होत आहे. गावातील तरुण पिढी शिक्षणामध्ये उच्च डिग्री मिळवून अधिकारी बनले आहे. तसेच अनेक जण शेती व्यवसायात होणारे नुकसाना मुळे नोकरीकरिता आता शहराकडे स्थलांतर करितांना आहे.

असे माझे छोटेसे गाव मला खूप आवडते आणि मला खूप प्रिय आहे मला जेव्हा कधी शाळेला सुट्ट्या लागल्या की मला गावची आठवण नक्की येते. आणि मी माझ्या गावी येतो.तुम्ही तुमच्या गावाला जाता काय आणि तुमच्या गावाचे नाव काय आहे खाली कमेंट मध्ये नक्की कळवा.

conclusion of  माझे गाव मराठी निबंध | maze gaon marathi in nibandh

तर हा होता माझा गाव माझे गाव मराठी निबंध maze gaon marathi nibandh my village essay in marathiवर निबंध तुम्हाला हा निबंध कसा वाटला.खाली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आणि बंद आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा मदत होईल आणि जर आपल्याकडे काही प्रश्न असतील व कोणत्या विषयावर निबंध हवा असेल तर खाली कमेंट मध्येनक्की कळवा आम्ही त्यावर तुम्हाला निबंध देण्याचा प्रयत्न करू.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या