स्वातंत्र्य दिनाची बातमी | batmi lekhan on independence day in marathi

स्वातंत्र्य दिनाची बातमी | batmi lekhan on independence day in marathi

नमस्कार मित्रांनो आजच्या लेखामध्ये आज आपण स्वातंत्र्य दिनाची बातमी/ batmi lekhan on independence day in marathi कशी तयार करायची हे बघणार आहोत. जर तुम्हाला बातमी लेखन म्हणजे काय ? हे माहिती  करायचे असेल तर यापूर्वी आम्ही त्यावर एक लेख लिहिला आहे. तो तुम्ही नक्की वाचा.

त्यामध्ये आणि बातमी लेखन विषयी सविस्तरपणे सांगितले आहे . या batmi lekhan on independence day in marathi  मध्ये तुम्हाला पुढील प्रमाणे प्रश्न दिल्या जाईल त्यावरून तुम्हाला बातमी तयार करावी लागेल.

स्वातंत्र्य दिनाची बातमी/ batmi lekhan on independence day in marathi
स्वातंत्र्य दिनाची बातमी/ batmi lekhan on independence day in marathi 

स्वातंत्र्य दिनाची बातमी/ batmi lekhan on independence day in marathi 


प्रश्न :तुमच्या शाळेत साजरा होणाऱ्या स्वातंत्र्य दिनाची बातमी तयार करा.


स्वातंत्र्य दिनाचा सोहळा साजरा
(कार्यालय प्रतिनिधी द्वारा)

मुंबई बोरिवली, 15 ऑगस्ट येथील आदर्श प्राथमिक व माध्यमिक शाळेत मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला. शाळेमध्ये कार्यक्रमाची सुरुवात सकाळी सात वाजता झाली. मुंबई येथील प्रसिद्ध समाजसेवक आणि लेखक श्री अण्णासाहेब पाटील (नाव काल्पनिक) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेमध्ये विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.त्यामध्ये सर्वांचे लक्ष भाषण स्पर्धा आणि देशभक्तीपर वेशभूषा स्पर्धेने वेधले.वेशभूषा स्पर्धेमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी विविध स्वातंत्र्यसेनानी यांच्या वेशभूषा केल्या होत्या.

त्यानंतर यानंतर कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे आणि मुख्याध्यापक यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व व स्वातंत्र्य मिळण्यासाठी स्वातंत्र्यसेनानी चे योगदान याविषयी मार्गदर्शक भाषणे दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्ग दहावीच्या विद्यार्थिनीने केले.

विविध स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या द्वारे पुरस्कार  व प्रशस्तीपत्रक वितरित करण्यात आले.

आणि सर्वात शेवटी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून आभार प्रदर्शन करण्यात आले व देशभक्तीपर नारे लावून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

समाप्त

तर हे होते स्वातंत्र्य दिनावर बातमी लेखन | batmi lekhan on independence day in marathi जर तुम्हाला ही बातमी लेखन आवडले असेल व तुम्हाला कोणत्या विषयावर बातमी लेखन लिहून हवे असेल तर कमेंट मध्ये नक्की कळवा.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या