शिक्षक दिन भाषण मराठी |shikshak din marathi bhashan|Teachers day speech in marathi 2023
शिक्षक दिन भाषण मराठी 2023| Teacher day speech in marathi:नमस्कार इन्फिनिटी मराठी या ब्लॉगवर तुमचे सहर्ष स्वागत आहे. आजच्या या लेखामध्ये आज आम्ही शिक्षक दिनानिमित्त अतिशय सुंदर असे भाषण सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
शिक्षक दिन वर भाषण shikshak din marathi bhashan आपण आपल्या शाळेच्या भाषणासाठी सुद्धा वापरू शकता तर चला मग बघू या teachers day speech in Marathi भाषणाला सुरुवात करूया.
शिक्षक दिन वर भाषण | teachers day speech in marathi |
शिक्षक दिन भाषण मराठी | Teacher day speech in marathi 2023 | shikshak divas bhashan marathi.
गुरुविना ना मिळे ज्ञानज्ञान विन ना मिळे सन्मानजीवन भव सागर तरायाचला वंदू गुरु राया
speech for teachers day in marathi:आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उपस्थित सर्व माझे आदरणीय प्रिय शिक्षक वर्ग व माझे मित्र मैत्रिणींनो.
आज 5 सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिन,आजच्या या शिक्षक दिनानिमित्त आपण येथे सर्वजण उपस्थित झाले आहोत. अशा या शुभ दिवशी म्हणजेच शिक्षक दिनी आज मी तुम्हाला दोन शब्द सांगणार आहे, मला आशा आहे की तुम्ही ते शांत चित्ताने ऐकून घ्यावे.
शिक्षक म्हणजे अंधारात हरवलेल्या प्रकाशात आणणारा
शिक्षक म्हणजे वाळवंटामध्ये हरवलेल्या व्यक्तीला रस्ता दाखवणार.
शिक्षक म्हणजे माणसाच्या आयुष्याचे संदर्भासहित स्पष्टीकरण.
अशा कितीतरी उपमा शिक्षकाला दिल्या तर त्या कमीच पडतील.आजपर्यंत समाजाकडून कोणतीही अपेक्षा न ठेवता निस्वार्थ भावनेने ज्ञान दानाचे कार्य करणाऱ्या आपल्या गुरुवर्य म्हणजे आपल्या प्रिय शिक्षकाच्या सन्मानाचा आज दिवस आहे. तो दिवस म्हणजे शिक्षक दिन.
शिक्षक दिवसाची सुरुवात म्हणजेच शिक्षक दिन हा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त दरवर्षी संपूर्ण भारतामध्ये मोठ्या आनंदाने साजरा केला जातो.
5 सप्टेंबर या दिवशी डॉक्टर राधाकृष्णन यांचा जन्मदिवस डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना शिक्षकाविषयी खूपच आवड होती. त्यांच्या आयुष्यात त्यांनी शिक्षण क्षेत्रात अतिशय महत्त्वाची कामगिरी बजावली आहे.
त्यांचे असे म्हणणे होते की शिक्षणाशिवाय कोणताही व्यक्ती आपले ध्येय गाठू शकत नाही. ते म्हणतात की व्यक्तीच्या आयुष्यात शिक्षणाचे खूप असे अनन्यसाधारण महत्त्वाचे स्थान आहे.
डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या बद्दल सांगायचं झालं तर त्यांचा जन्म 5 सप्टेंबर1888 मध्ये मद्रास येथील तिरुवल्लुर या गावी झाला.
ते स्वतंत्र भारतातील पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती होते. देशाचे राष्ट्रपती होण्यापूर्वी ते एक नामांकित शिक्षक तज्ञ होते त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात अतुलनीय असे योगदान दिले.
आज येथे जमलेल्या सर्व उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना असे वाटत असेल की या शिक्षक दिनाचे काय महत्त्व आहे आपण शिक्षक दिन का साजरा केला पाहिजे.
तर भारतात प्राचीन काळापासून गुरु-शिष्य परंपरा चालत आली आहे गुरु म्हणजे शिक्षक. शिक्षक हा आपल्या विद्यार्थ्याला त्याच्या आयुष्यात तो सर्व संकटांना कसे सामोरे जाईल याचे शिक्षण देत असतो.शिक्षक हा त्याचा भविष्याचा निर्माता असतो.
शिक्षणामुळे व्यक्ती आज समाजामध्ये उच्च ठिकाणी पोहोचू शकतो याचे सर्व श्रेय शिक्षकाला जाते.शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांच्या आयुष्याला, त्याच्या जीवनाला योग्य ती वळण लागते.
ज्याप्रमाणे कुंभार आपल्या मडक्याला आकार देऊन योग्य प्रकारे घडवत असतो. त्याचप्रमाणे शिक्षक हा आपल्या विद्यार्थ्यांना घडवत असतात. त्यांच्या भविष्याला आकार देत असतो.
वर्गात तासन्तास उभे राहून घसा कोरडा होईपर्यंत चा निर्मल भावनेने शिक्षक हे आपल्या ज्ञानदानाचे कार्य करत असतात.
शिक्षक म्हणजे कोण तर शिक्षक म्हणजे असत्या कडून सत्याकडे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा दीपस्तंभ शिक्षक हे नेहमी विद्यार्थी यान सोबत असतात.नवनवीन ज्ञान संकल्पना जाणून घेऊन शिकण्याची त्यांची मानसिकता असते.
आजच्या काळात नवसमाज निर्मिती व समाज परिवर्तन अशी दुहेरी जबाबदारी शिक्षकांवर येऊनप पडली आहे
विद्यार्थ्यांची व पर्यायाने भावी समाजाची विवेकबुद्धी जागृत करून ती कार्यप्रवण करण्याचे काम हे फक्त शिक्षकच करू शकतात.
शिक्षकांसाठी गुरु जनांसाठी मी एवढेच म्हणू इच्छिते की शिक्षक जगतात अज्ञानाचा नाश करून समाजाला प्रकाशमान बनवितात.
माझ्या आजपर्यंतच्या जीवनाच्या प्रवासात मला कळत नकळत ज्ञान देणाऱ्या माझ्या सर्व शिक्षकांना गुरुजनांना माझा नमस्कार आणि शिक्षक दिनाच्या आपणास
मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद
शिक्षक दिन वर विचारले जाणारे प्रश्न
प्रश्न १.शिक्षक दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो?
A.१शिक्षक दिन पाच सप्टेंबरला साजरा केला जातो.
प्रश्न 2.शिक्षक दिन या दिवशी कोणत्या व्यक्तीचा जन्मदिन असतो?
A.2शिक्षक दिन या दिवशी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म असतो.
प्रश्न 3.डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून का साजरा केला?
A3.डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी आपल्या आयुष्यात शिक्षण क्षेत्रामध्ये महत्त्वाची भूमिका बजावल्यामुळे त्यांचा जन्मदिवस शिक्षक दिवस म्हणून साजरा केला जातो
या भाषणाचे शीर्षक पुढीलप्रमाणे असू शकते
- teachers day speech in Marathi by student and teacher
- 5 september teachers day speech in marathi
- dr sarvepalli radhakrishnan teachers day speech in marathi
- happy teachers day speech in marathi
- speech for teachers day in marathi
- shikshak din marathi bhashan | shikshak din marathi bhashan
Read more: teachers day nibandh in marathi essay on teachers day
0 टिप्पण्या