शिक्षक दिन बातमी लेखन मराठी | teachers day batmi lekhan in marathi

 नमस्कार आजच्या लेखामध्ये आज आपण टीचर डे वे बातमी लेखन म्हणजे शिक्षण दिन यावर बातमी लेखन बघणार आहोत.शिक्षक दिनाची बातमी तयार करा हा प्रश्न परीक्षेमध्ये नेहमीच विचारला जाणारा प्रश्‍न आहे. तर चला मग बघूया teachers day batmi lekhan in marathi

शिक्षक दिन बातमी लेखन मराठी | teachers day batmi lekhan in marathi

शिक्षक दिन बातमी लेखन मराठी | teachers day batmi lekhan in marathi
शिक्षक दिन बातमी लेखन मराठी | teachers day batmi lekhan in marathi


शिक्षक दिनाविषयी बातमी लेखन

शिक्षक दिनाची बातमी लेखन करताना तुम्हाला परीक्षेमध्ये खालीलप्रमाणे प्रश्न दिलेला असेल.

तुमच्या शाळेत झालेल्या शिक्षक दिनाची बातमी तयार करा.

या प्रश्नावर तुम्हाला योग्य सुटसुटीत आणि सोप्या भाषेत बातमीलेखन  तयार करावी लागेल

जर तुम्हाला बातमी लेखन म्हणजे काय बातमी लेखन कसे करावे याबद्दल सविस्तर माहिती हवी असेल तर खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपूर्ण माहिती वाचू शकता.


Teachers day batmi lekhan in Marathi करताना लक्षात घ्यावयाच्या काही गोष्टी.

बातमी लेखन करताना जो विषय दिला जातो तो विषय नीट समजून घ्यावा म्हणजेच आपला प्रश्न तुमच्या शाळेत झालेल्या शिक्षक दिनाची बातमी लेखन तयार करा असे आहे म्हणजेच बातमी तयार करताना शाळेत कशाप्रकारे शिक्षक दिन साजरा करण्यात आला, कार्यक्रम मध्ये काय काय घडले या विषयी थोडक्यात माहिती सांगावे लागेल.

शिक्षक दिना 5 सप्टेंबर या दिवशी असतो म्हणून बातमी लिहीत असताना बातमी ची तारीख ही दुसऱ्या दिवसाची लिहावी कारण आपण बातमीचा अहवाल दुसऱ्या दिवशी सादर करीत असतो.

बातमी लेखन हे शिक्षक दिन साजरा झाल्यावर केली जाते म्हणजेच घडलेल्या गोष्टीवर बातमी ही तयार केली जाते म्हणून बातमी लेखन हे संपूर्ण भूतकाळात लिहावे.

बातमी लेखन करीत असताना बातमी लेखन कमीत कमी शब्दात लिहावे आणि बातमीला योग्य असे मथळा म्हणजेच शीर्षक द्यावे.

शिक्षक दिन बातमी लेखन मराठी | teachers day batmi lekhan in marathi

शिक्षक दिनाचा कार्यक्रम साजरा

दिनांक 6 सप्टेंबर
आमच्या वार्ताहरा कडून
               

पुणे दिनांक 6 सप्टेंबर:5 सप्टेंबर या दिवशी स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती यांच्या जन्मदिनी सर्व भारतामध्ये शिक्षक दिन साजरा केला जातो  शिक्षक दिनाचे औचित्य साधून पाच सप्टेंबर रोजी पुणे येथील श्री शिवाजी महाविद्यालयात शिक्षक दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी शिक्षक दिवस हा मोठ्या उत्साहात साजरा केला. 

शिक्षक दिन या कार्यक्रमाची रूपरेषा विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने आखली. व कार्यक्रम योग्यरीत्या पार पाडला.दुपारच्या सुट्टीनंतर विद्यालयाच्या सभागृहांमध्ये शिक्षक दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनींनी गायलेल्या स्वागत गीताने झाली. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि अध्यक्ष आणि इतर शिक्षकांना शाल आणि श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.

शिक्षक दिनानिमित्त शाळेचे मुख्याध्यापक आणि कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांनी शिक्षकाचे महत्त्व समाजात असलेली शिक्षकाची गरज या विषयी भाषणे दिली.

शिक्षक दिनानिमित्त कार्यक्रमाचे कार्यक्रमांमध्ये भाषण स्पर्धा सुद्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये विविध वर्गातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपापले भाषणे सादर केली. भाषण स्पर्धेनंतर विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस आणि प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.

त्यानंतर विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या सन्मान करिता त्यांना पुष्पगुच्छ दिले आणि त्यांचे आभार मानले आणि सर्वात शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन घेण्यात आले आणि कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.


तर हे होता शिक्षक दिनाची बातमी लेखन. Teachers day batmi lekhan in Marathiजर तुम्हाला ही बातमी लेखन आवडले असेल व या संबंधित काही प्रश्न असेल तर खाली कमेंट मध्ये नक्की विचारा आम्ही जर तुम्हाला आणखी कोणत्या विषयावर बातमी लेखन किंवा निबंध व आणखी कोणती माहिती हवी असेल तर खाली कमेंट मध्ये नक्की विचारा धन्यवाद



टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या