पावसाळ्यातील एक दिवस मराठी निबंध | pavsalyatil ek divas nibandh in marathi
पावसाळ्यातील एक दिवस pavsalyatil ek divas nibandh |
पावसाळ्यातील एक दिवस pavsalyatil ek divas : नमस्कार मित्रांनो आजच्या लेखामध्ये आज आपण पावसाळ्यातील एक दिवस मराठी निबंध बघणार आहोत. पावसाळा हा माझा आवडता ऋतू आहे. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये पावसाळ्यातील कोणता ना कोणता एक क्षण हा आठवणीचा असतो.
पावसाळ्यातील एक दिवस मराठी निबंध | pavsalyatil ek divas nibandh in marathi
पावसाळ्याचे दिवस सुरू होते आणि माझ्या शाळेमध्ये माझी घटक चाचणी परीक्षा सुरू होती सुरवातीचे दोन-तीन पेपर झाले होते आणि आज जो पेपर होता तो मला न जमणारा म्हणजे सर्वात कठीण विषय म्हणजेच गणित या विषयाचा पेपर होता.
मी गणिताच्या पेपर साठी रातभर जीवापाड तयारी केली होती. पण सकाळी जेव्हा उठलो तेव्हा मला काहीच म्हणजेच थोडेफार आज आठवत होते. माझा अर्धाच अभ्यास झाला होता. मी भीत भीत शाळेला जाण्याची तयारी करत होतो.
जवळपास माझी सर्व तयारी झाली होती आईने माझा डबा सुद्धा तयार केला होता.आणि मी आता एका तासानंतर शाळेला निघणारच होतो की, पण
अचानक वातावरणामध्ये बदल झाला. पूर्ण आकाशामध्ये काळेभोर ढग जमा झाले. आणि सर्वीकडे अंधार पसरला.वारा जोरात जोरात वाहू लागला.आणि मोठ्या आवाजात विजांचा कडकडाट सुरू झाला.
आणि बघता बघता एन शाळेच्या वेळेवर खूपच जोराचा पाऊस सुरू झाला. सर्व रस्ते पाण्याने तुडुंब भरून गेलेले होती.जिकडेतिकडे परिसर जलमय झाला होता.पाण्याचे हे रौद्र रूप पाहून सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी घोषित करण्यात आली.
धो-धो पाऊस असल्याने बाबांच्या ऑफिस मध्ये पाणी शिरल्याने बाबांना ऑफिस मधून सुट्टी देण्यात आली होती.
माझ्या शाळेतून पण माझ्या वर्गात शिक्षकाचा माझ्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांना आज शाळेला सुट्टी आहे असा मेसेज आला.तो मेसेज मला बाबांनी सांगताच मला खूप आनंद झाला.कारण तो आता गणितचा पेपर हा सर्वात शेवटी होणार होता.
एकदम अचानक मिळालेली सुट्टी आणि पेपर सुद्धा पुढे ढकलण्यात आला यामुळे मला अतिशय खूपच आनंद होत होता.आणि सोबतच आई-बाबा आणि सर्वजण घरी असल्याने आईने मस्त पैकी जेवणाचा बेत केला.
आईने बनवलेले छान जेवण करून मी मस्तपैकी गणिताचा अभ्यासाला लागलो.
मस्तपैकी चार-पाच तास मी गणित या विषयाचा अभ्यास त्यानंतर उर्वरित वेळेत टीव्हीवर पावसाच्या बातम्या पाहिल्या, आणि माझ्या बाबासोबत व्हिडिओ गेम खेळण्याचा आनंद घेतला,सोबतच,मोबाईल वरती गेम खेळणार सुद्धा आस्वाद घेतला.
अशाप्रकारे मी सर्वात आधी माझा अभ्यास पूर्ण करून सुट्टीचा पुरेपूर आनंद घेतला.
दिवसभराच्या धो धो पावसामुळे जिकडे तिकडे पाणीच पाणी साचलेले होते.संपूर्ण परिसर जलमय झाले होते.
परंतु काही वेळाने पावसाचा जोर कमी होऊन पाणी पाऊस पूर्णपणे थांबला होता आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा निरभ्र आकाश निघाले होते. अशा प्रकारे तो माझा पावसाळ्यातील एक दिवस होता.
त्या दिवशी मला असं वाटले की माझा अभ्यास न झाल्यामुळेच पाऊस जणू माझ्या मदतीला आला. जर हा पाऊस आला नसता तर माझा पेपर खूपच खराब गेला असता आणि मला पेपर मध्ये खूपच कमी गुण मिळाले असते अशा प्रकारे त्या दिवशी पावसाने मला वाचवले.
2 टिप्पण्या
झटपट पैसा कमवा ऑनलाईन पद्धतीने अगदी मोफत.
उत्तर द्याहटवाnice info. do visit my blog too - https://www.bedunechar.in
उत्तर द्याहटवा