vruttapatra che manogat marathi nibandh | वृत्तपत्र चे मनोगत मराठी निबंध
वृत्तपत्राचे मनोगत मराठी निबंध :वृत्तपत्राचे स्थान हे मानवी जीवनात अनन्यसाधारण आहे.वृत्तपत्रांमुळे आपल्याला आणि कशाला चालू घडामोडी आणि विविध घटनांची माहिती मिळते.नमस्कार मित्रांनो आजच्या लेखामध्ये आज आपण वृत्तपत्राचे मनोगत म्हणजेच वृत्तपत्राचे आत्मवृत्त हा निबंध बघणार आहोत.
या निबंधामध्ये वृत्तपत्र एका शाळकरी विद्यार्थ्यांची सोबत बोलताना चे दाखवलेले आहे. जर वृत्तपत्र बोलू लागले तर काय बोलेल, हे या निबंध मध्ये सांगण्यात आलेले आहे. तर चला मग सुरु करूया वृत्तपत्राचे मनोगत म्हणजेच आत्मवृत्त हा निबंध,vruttapatrachi atmakatha in marathi essay.
वृत्तपत्र चे मनोगत मराठी निबंध | vruttapatra che manogat marathi nibandh
आज मी वर्तमानपत्र वाटायला घेऊन जात होतो.एक एक करता माझे सर्व वर्तमानपत्रे आपापल्या ठिकाणी पोहोचवून झाली होती.मग शेवटी पिशवीत पाहतो तर काय एक वर्तमानपत्र अजुनही शिल्लक होत. मी सायकल ला पायडल मारून ते वर्तमानपत्र परत करायला निघालोच होतो.
तसं मला आवाज आला रे मित्रा थांब थांब कुठे निघालास मला तुझ्याशी बोलायचं आहे मी इकडे तिकडे नजर फिरवून बघितलं तर मला जाणवलं की हा आवाज माझ्या पिशवीतून येत आहे, आणि मी ती पिशवी उघडून बघितलं तर काय चक्क वर्तमानपत्र माझ्याशी बोलत होतं,ते मला पुढे म्हणालो चल थोडं निवांत ठिकाणी बसुया मग मी त्याला घेऊन एका झाडाखाली आलो व त्याकडे एक टक लावून पाहत बसलो व ते वर्तमानपत्र बोलू लागले.
कसं काय मित्रा सर्व ठीक आहे. मी तर फार मजेत आहे येत्या काळात कदाचित माझे अस्तित्व नष्ट होईल पण सध्या मी फार बरा आहे. तुला माहिती आहे माझी उत्पत्ती फार वर्षांपूर्वी झाली जवळजवळ दोनशे वर्षांपूर्वी आपल्या भारतात पहिला इंग्लिश वर्तमानपत्र हा तयार झाला होता 1797 मध्ये कलकत्ता येथे हा वृत्तपत्र सापडला होता पण हे वृत्तपत्र सर्वसामान्यांना समजण्यासारखे नव्हते.
त्यानंतर आपल्या भारतात इसवीसन 1826 मध्ये पहिला हिंदी वर्तमानपत्र उदंड कोलकत्ता येथे तयार केला होता त्यानंतर आपल्या मायबोली मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र इसवीसन १८३२ मध्ये सुरू झाले.ज्याचे नाव दर्पण असे होते या वृत्तपत्राची सुरुवात बाळशास्त्री जांभेकर यांनी केली होती.
पुढे जर एस वर्तमानपत्र उदयास आले जसे की केसरी मराठा दिन बंधू बहुजन लोकनायक आणि असे बरेच वर्तमानपत्रे तयार झाली.हल्लीच्या काळात लोक मला मोबाईल द्वारे सुद्धा वाचू शकतात पण ते काही फारसं चांगलं वाटत नाही.
मला तर तुम्ही लोकांनी हातात घेऊन एक एक पान चाळून त्याच्या घोटावर वाचलेलंच आवडते.काय आहे नात्यातून तुम्हाला वाचनाची गोडी निर्माण होते व तुमच्या डोळ्यांनाही त्रास होत नाही शिवाय कोडे सोडवताना मोबाईल मध्ये पंचायत पडते कागदी वर्तमानपत्रावर तुम्ही सहज लिहू शकता किंवा कागदी वर्तमानपत्राची आपण वाटणी सुद्धा करू शकतो कोणाला बातमीच पान हवे असल्यास ते त्याला देता येते किंवा एखाद्या मित्राला त्याच्या आवडीची पुरवणी देता येते.
पण मित्रा तुझ्याकडे एक तक्रार आहे माझी तू सकाळी उठतो माझे गठ्ठे तयार करतो, मला जेव्हा वाटायला निघतो तेव्हा अक्षरशः मला उंचावर फेकून एखाद्या पर्यंत पोचवतो हे मात्र चुकीचा आहे त्याच्या नादात मला कधीकधी दुखापत होते.आणि तू जेव्हा मला फाटकातून फेकतो तेव्हा मी कुठेही पडून जातो,कधीकधी अक्षरशः पाण्यामध्ये मी भिजून जातो त्यामुळे माझ्यावरील लिहिलेले माहिती नष्ट होते.
मला वाचून झाल्यानंतर पुष्कळ घरामध्ये मी मोठ्या प्रमाणात जमा होतो. मी पुष्कळ प्रमाणात उपलब्ध असल्याकारणाने कोणी माझा उपयोग शोभेच्या वस्तू बनवण्यात करिता करतात तर कोणी मला रद्दी वाल्यांना विकून टाकतात.
त्यानंतर त्या रद्दीवाला पासून माझा प्रवास विविध ठिकाणी होतो. कोणी माझा उपयोग चने खरमुरे बांधायला करतात. तर कोणी चिवडा बांधायला माझा उपयोग करतात. तर कोणी एखाद्या शोभेच्या दुकानात शुभेच्या वस्तू बांधायला घेतात माझ्या उपयोग फक्त ज्ञानात भर पडण्यासाठी नाही तर बऱ्याच ठिकाणी केला जातो.
याचा मला अभिमान आहे पण बरं का मित्रा या जगात असेही लोक आहेत की जे मला साठवून ठेवतात. एखादी महत्त्वाची बातमी असली त्याचे कात्रण कापून आयुष्यभर आपल्या सोबत साठवून ठेवतात.
अशा लोकांचा मला फार अभिमान वाटतो. तसं मला मला माणसांनीच त्याच्या सोयीसाठी उपयोगासाठी आणि माहितीचे दळणवळण करण्यासाठी तयार केले होते
माणसाची निर्मिती खूपच चांगली व सोयीस्कर आहे बरं मित्र आता निरोप घेतो तुझ्याशी बोलून आपले मनोगत व्यक्त करून फार छान वाटलं.चला आता तुझ्या कामाला असे बोलून ते वर्तमानपत्र चूप झालं तो.मला त्या वर्तमानपत्राचे मनोगताचे नेहमीच आठवण राहील त्याने मला खूप छान छान गोष्टी सांगितल्या नंतर मी उठलो आणि ते वर्तमानपत्र परत करायला निघालो.
0 टिप्पण्या