मी पाहिलेला क्रिकेटचा सामना मराठी निबंध | mi pahilela cricket cha samna
माझा आवडता खेळ क्रिकेट आहे आणि त्यात वर्ल्डकप म्हटले की माझ्या आनंदाचा ठिकाणच नसतो. प्रत्येक वर्ल्ड कप आम्ही न चुकता बघतो या वर्षी सुद्धा वर्ल्डकप येणार होता आणि त्याचे वेळापत्रक घोषित झाले होते.
मी उत्साहाने भारताचे सामने कधी आहे हे वेळापत्रकामध्ये बघत होतो. वेळापत्रक बघता बघता,ते सामने कुठे खेळले जाणार आहे ते सुद्धा मी बघत होतो व त्यामध्ये त्यातील एक महत्वाचा भारताचा सामना नागपूर येथे होणार होता.
- नक्की वाचा प्रजासत्ताक दिन प्रसंगलेखन
मी मनाशी ठरवले की यावर्षी कोणत्याही परिस्थितीमध्ये हा सामना आता स्टेडियमवर बघायला जायचे.नंतर मी आई आणि बाबांना विचारले असता ते सुद्धा हा सामना बघण्याकरिता राजी झाले, त्यांनी हा क्रिकेटचा सामना बघण्यासाठी मला होकार दिला. होकार देताच माझा आनंद गगनात मावेनासा झाला.
मग बाबांनी मॅचची तिकिटे ऑनलाईन बुक केली. मी प्रथमच क्रिकेटचा सामना स्टेडियमवर ती बघणार होतो. सर्व भारतीय संघातील खेळाडू जे की मी टीव्ही मध्ये आजपर्यंत बघत होतो मी आता समोरासमोर बघणार होतो.
मग आम्ही मॅच बघण्याकरिता स्टेडियम साठी रवाना झालो आणि थोड्याच वेळात आम्ही क्रिकेटच्या स्टेडियम वर पोचलो.
माझ्याप्रमाणेच अनेक भारतीय समर्थक आणि विदेशी समर्थक पण क्रिकेटचा सामना बघण्यासाठी आले होते. मग आम्ही आमच्या जागेवरती जाऊन बसलो.
मॅच सुरू होण्याला अर्धा तास बाकी असल्याने मी आणि माझे बाबा बाहेर मिळणाऱ्या आपल्या संघाच्या जर्शी,पुंगी आणि चौकार-षटकार याचे फलक आणि खायला काही वस्तू विकत आणल्या.
आता मॅचला सुरुवात होणार होती की टॉस करण्यासाठी दोन्ही संघातील कर्णधार मैदानात आले नंतर सिक्का वरून उचलून नाणेफेक झाली आणि यामध्ये ऑस्ट्रेलिया संघ जिंकला.
नंतर त्यांनी प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि आता भारतीय संघातील प्रथम गोलंदाजी मिळाली होती म्हणून भारतीय संघातील सर्व खेळाडू मैदानावर ती आले. मी प्रथमच भारतीय संघातील सर्व गडी बघितले होते. म्हणून मला तिचे खूप आनंद होत, होता. आपण स्वप्नात तर नाही असे मला वाटू लागले.
3 टिप्पण्या
He nibandh thodes lahan aahe
उत्तर द्याहटवाIAS chya exam la baslela nahi mothe mothe nibandha lehayla
हटवाV hi tko
उत्तर द्याहटवा