माझा आवडता खेळ लंगडी मराठी निबंध | Maza avadta khel langdi nibandh

 माझा आवडता खेळ लंगडी मराठी निबंध | Maza avadta khel langdi nibandh 

नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामद्धे माझा आवडता खेळ लंगडी हा मराठी निबंध |  maza avadta khel langdi nibandh हा निबंध बघणार आहोत तर चला मग सुरू करूया निबंध  माझा आवडता खेळ लंगडी 


माझा आवडता खेळ लंगडी:आपल्या लहानपणी आपण अनेक असे पारंपरिक खेळ खेळले असेल त्यामध्ये दोरी पकडापकडी लपाछपी आणि लंगडी या खेळाचा आपल्या खेळामध्ये नक्कीच समावेश असेल.मी पण यापैकी सगळे खेळ खेळलो आहे पण मला सर्वात जास्त लंगडी हा खेळ आवडतो म्हणून  माझा आवडता खेळ लंगडी हा आहे.

लंगडी हा खेळ महाराष्ट्रातील पारंपारिक खेळ आहे.हा खेळ महाराष्ट्राच्या सर्व काना कोपऱ्यामध्ये आणि शहरी असो वा खेडेगावांमध्ये मोठ्या आनंदाने खेळल्या जातो.

लंगडी हा खेळ खेळायला अतिशय सोपा आहे हा खेळ विविध भागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे केल्या जातो. या खेळाचे अनेक असे प्रकार महाराष्ट्र मध्ये आहे.

हा खेळ खेळण्याकरिता कोणत्याही साहित्याची आवश्यकता नसते पण एका वेगळ्या प्रकारच्या लंगडी खेळा मध्ये आपल्याला एक टिप्पस आणि एका खडू ची फक्त आवश्यकता असते.
लंगडी हा खेळ सांघिक खेळ आहे आणि हा खेळ एक  एकट्या मध्ये सुद्धा खेळला जाऊ शकते. सांघिक खेळ मध्ये या खेळा मध्ये दोन संघा असतात.

प्रत्येक संघामध्ये 15 खेळाडू असतात त्यापैकी प्रत्यक्षात बारा खेळाडू हा खेळ खेळण्यासाठी मैदानात उतरतात आणि उर्वरित तीन खेळाडू हे राखीव खेळाडू मध्ये मैदानाच्या बाहेर असतात.

लंगडी या खेळाचे मैदान वेगवेगळ्या प्रकारचे असते पण शाळेत स्पर्धा खेळण्यासाठी मैदान दहा मीटर रुंद आणि दहा मीटर लांब एवढे असते.मैदानाच्या मधोमध एक मध्य रेषा आखली जाते.सर्वात परत जाऊन कोणता संघ संरक्षण करेल आणि कोणता संग्रह आक्रमण करेल यासाठी सर्वात प्रथम नाणेफेक केले जाते.

लंगडी जो संघ घालतो त्यांना आक्रमण असे  म्हणतात आणि जो संघ मैदानात संरक्षणा असतो त्यांना संरक्षक असे म्हणतात.मग आक्रमण संघातील एक जण कोणत्याही पायाने लंगडत जाऊन संरक्षक संघातील खेळाडूंना हात लावून बाद करण्याचा प्रयत्न करीत असतो.

लंगडी या खेळा मध्ये चार ईनिंग असतात प्रत्येक ईनिंग ही नऊ मिनिटाची असते.
या खेळामध्ये लंगडी घालणारा खेळाडु हा मैदानाबाहेर जाऊ शकतो परंतु त्याला त्याचा पाया हा हवेतच ठेवावा लागतो आणि

संरक्षण संघातील खेळाडू ना मैदानाबाहेर जाता येत नाही आणि संरक्षण संघातील खेळाडू मैदानाबाहेर गेल्यास किंवा त्याचा पाय रेषेला स्पर्श झाला त्याला बाद करण्यात येते.
जो संघ सर्वाधिक गडी बात करतो त्या संघाला विजय संघ म्हणून बघितले जाते अशा प्रकारे लंगडी हा खेळ खेळला जातो.

आमच्या शाळेच्या मैदानात आम्ही दुपारच्या सुट्टीमध्ये आम्ही लंगडी हा खेळ नियमित खेळतो. हा खेळ खेळल्यामुळे आम्हाला अतिशय आनंद होतो. या खेळामुळे आमच्या शरीराला योग्य असा व्यायाम मिळतो. यासोबतच पायाचे स्नायू सुद्धा मजबूत होते. अशाप्रकारे माझा आवडता खेळ लंगडी आहे. हा खेळ खेळत असताना मला कधीही कंटाळा येत नाही धन्यवाद.

तर हा होता  माझा आवडता खेळ लंगडी मराठी निबंध | Maza avadta khel langdi  निबंध तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे आम्हाला कळवण्याकरिता तुम्ही खाली कमेन्ट करू शकता.तुम्ही हा निबंध आपल्या मित्रामैत्रिणी बरोबर शेअर करू शकता,जेणे करून त्यांची पण मदत होईल धन्यवाद. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या