मी पाहिलेले / मला पडलेले एक स्वप्न मराठी निबंध | mala padlele swapna marathi nibandh

 मी पाहिलेले / मला पडलेले एक स्वप्न मराठी निबंध | mala padlele swapna marathi nibandh 

 नमस्कार मित्रांनो या ब्लॉगवर तुमचे स्वागत आहे,आजच्या लेखामध्ये आज आपण मी पाहिलेले स्वप्न मराठी निबंध मला पडलेले स्वप्न निबंध हा मराठी निबंध बघणार आहोत या निबंधामध्ये शाळेतील  एका विद्यार्थ्याला पडलेलल्या स्वप्नाचे वर्णन दाखवले आहे, हा निबंध वर्ग चार ते दहा चे विद्यार्थी आपल्या अभ्यासा साथी वापरू शकता  तर तमग सुरू करूयात ,mala padlele swapna marathi nibandh


मला पडलेले स्वप्न

काल रविवार होता आणि आज मला भरपूर कामे होती काय आहे न हप्त्या भराची पूर्ण कामे आम्ही रविवारीच करत असतो जसे की बाजार आणणे,रशन आणणे ,घराची सफाई आणि बरीच सारी छोटीमोठी कामे असतात.

  दिवसभर घराची सफाई आणि संध्याकाळी बाबासोबत बाजारात जाऊन सामान घेवून आलो. मी फार दमलो होतो. मग आईच्या हातचे स्वादिष्ट जेवण जेवून मन तृप्त झाले.मग आम्ही आवारात झोपण्याची तयारी करून आपआपल्या बिछान्यावर पहुडलो.बिछान्यावर पडताच माझी नजर निरभ्र चांदण्या नी लख्ख अश्या आकाशाकडे गेली.त्या लुकलुकनाऱ्या चांदण्याकडे पाहून माझे मन खूपच प्रसन्न झाले व दिवसभराचा शीण उतरल्या सारखं वाटत होतं.

सगळेजण झोपी गेले होते. मी आकाशाकडे चांदण्या बघत होतो व त्यासोबतच मी आजीबाई ची सुद्धा खाट बघत होतो. चांदण्या मोजता मोजता मला काही वेगळाच प्रकार आकाशात दिसू लागला. मला असे दिसले की काही चांदण्या एकमेकांच्या जवळ येत होत्या व त्या चांदण्या चक्क माझे नाव आकाशामध्ये लिहित होते ते दृश्य पाहून एक क्षण मी आश्चर्यचकित झालो. पण यासोबतच मला कुतूहल वाटलं आणि फार आनंदही वाटला.

पुढे त्या चांदण्या एक एक करून माझ्याजवळ पृथ्वीवर येत होत्या. मी त्या चांदण्याला जेव्हा अलगत उचलण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या माझ्या हातातून निसटून त्यांनी चक्क एक रथ तयार केला. व त्यात एक रथ चालवणारा मोरक्या बसला होता.

मला त्याने रथांमध्ये बसण्याकरिता लावले, आणि मग मी रथामध्ये बसून आकाशाच्या दिशेने वरच वर उंचच-उंच गेलो.

आणि त्या रथ चालवणाऱ्या मोरक्याने मला थेट चंद्रावरती नेऊन उतरवले चंद्रावर पोहोचताच मी तरंगू लागलो. चंद्रावर फारच गारवा होता मी तरंगत तरंगत इकडेतिकडे फिरू फिरता फिरता थोडे समोर गेल्यावर  मला चंद्रावरील एक  सुंदर ससा दिसला. पांढराशुभ्र मऊ लुसलुशीत व इवल्याशा तोंडाचा ससा पाहून मला त्याचा मोह सुटला.

मी त्याला पकडण्याकरिता त्याच्या मागे मागे तरंगत तरंगत पळू लागलो तो पण ससा पळू लागला. व एका ठिकाणी जाऊन थांबला.

तो परिसर फारच रमणीय सुंदर होता. टीकठिकाणी झाडे होती तेही चांदण्यांनी माखलेली होती. त्या झाडांचा लख्ख प्रकाश चोहीकडे पसरला होता.

मी त्या बगिच्यात इकडे तिकडे तयार करून फिरू लागलो माझा आनंद गगनात मावेनासा झाला होता. माझ्या आयुष्यातील मी पहिल्यांदाच असे विलोभनिय दृश्य पाहत होतो.त्या बगिच्यातला एका कोपऱ्यात माझी नजर पडली व मी त्या दिशेने तरंगत जाऊ लागलो.

तिथे पोहोचल्यावर मला दिसले की तिथे बरेच निरनिराळे खायचे पदार्थ होते त्यामध्ये लाडू पेढे जिलेबी इत्यादी निरनिराळे पदार्थ असतानाही माझी आई तिथे दुधाचा ग्लास घेऊन उभी होती.

व ती मला ते दूध पिण्यास आग्रह करू लागली मी नकार देत तेथून पळत होतो व पळता पळता माझा पाय कुठेतरी अडकला आणि मग मी आदळलो व जेव्हा उठून पाहिले तर मी कुठे गेलो नव्हतो मी माझ्या बिछान्यावर उठून खाली पडलो होतो तेव्हा मला कडू झाली की मी चंद्रावर साक्षात गेलो नसून मी एक स्वप्न पाहत होतो.

ते स्वप्न बघून मी शुद्धीवर आल्यानंतर मला माझाच खूप हसा आला. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या