नमस्कार मित्रांनो इन्फिनिटी मराठी या ब्लॉगवर तुमचे स्वागत आहे,आजच्या लेखामध्ये आज आपण मी फळा बोलतोय हा मराठी निबंध म्हणजेच फळ्याचे आत्मवृत्त हा निबंध बघणार आहोत या निबंधामध्ये शाळेतील फळा हा एका विद्यार्थ्यासोबत बोलताना दाखवले आहे आणि फळा जर बोलू लागला तर काय बोलेल हे सांगण्यात आले आहे, तर त्याला मग सुरू करूयात mi phala boltoy marathi nibandh मी फळा बोलतो हा निबंध.
mi phala boltoy marathi nibandh|मी फळा बोलतोय निबंध
mi phala boltoy marathi nibandh|मी फळा बोलतोय निबंध |
मित्रा मी फळा बोलतोय मला तर तू ओळखतोस ना माझ्यावर दररोज तू सुंदर अक्षराने सुविचार दिनविशेष लिहितो.रोज मी म्हणतो की तुझ्यासोबत बोलावे पण योग जुळत नव्हता पण आज योगायोगाने तू लवकर शाळेत आला आणि मी पण ठरवले की आज तुझ्या सोबत बोलायचे.
तर एक मित्रा मला तुला काही आज सांगायचे आहे तर मी फळा बोलतोय माझा जन्म हजारो वर्षांपूर्वी झाला सुरुवातीच्या काळामध्ये मी माझा रंग हा काळा होता माझे स्वरूपे कधी चौकोनी तर कधी आयताकृती असे असते.माझ्यामध्ये विविध बदल होऊन माझा रंग काळा पांढरा आणि हिरवा झाला आणि मी विविध प्रकारे उपलब्ध असतो यामध्ये जसे की प्लास्टिक लाकडी ग्रॅनाईट आता तर सुद्धा चक्क डिजिटल बोर्ड मध्ये सुद्धा माझे रूपांतर करण्यात आली आहे.
गणिताचे शिक्षक मोठमोठाले गणिते माझ्यावर लिहून तुम्हाला सोडवून दाखवतात यामुळे तुम्हाला पटापट गणित येतात तर विज्ञानाचे शिक्षक, इतिहासाचे शिक्षक आणि भुगोलाचे शिक्षक माझ्यावरती कठीण अशा आकृत्या काढून तुम्हाला सोपे करून शिकवता यामुळे तुम्हाला या विषयात अधिक रुची निर्माण होते. चित्रकलेच्या तासात तर अनेक विविध प्रकारचे रंगीबेरंगी चित्र माझ्यावर काढले जाते तेव्हा मला अतिशय आनंद होतो.
तुम्ही विद्यार्थी हे माझे एकाप्रकारे जवळचे सवंगडी आहे.तुमचे हसणे,रडणे,गप्पागोष्टी, तुमचे मन लावून शिकणे. हे वातावरण मला अतिशय रमणीय वाटते, यामुळे माझा दिवस कसा जातो हे मला कळत सुद्धा नाही.पण जशी तुम्हा विद्यार्थ्यांची शाळेची घरी जायची वेळ होते म्हणजेच सुट्टीची घंटा वाजते तेव्हा मात्र मला अतिशय दुःख होतं कारण तुम्ही सर्वजण घरी जातात व मी रात्रभर एकटाच असतो. तुम्ही शाळेत परत कधी येता, याची मी वाट बघत रात्रभर आराम करत असतो. आणि जेव्हा तुम्ही दुसऱ्या दिवशी शाळेत परत येतात तेव्हा मला पुन्हा अतिशय आनंद होतो.
माझा उपयोग शिक्षणासोबतच सुविचार दिनविशेष लिहिण्यासाठी, वेगवेगळ्या सूचना देण्यासाठी, आणि बऱ्याच कामासाठी होतो.
पण कधी कधी मला दुःख सुद्धा होते तुमच्या पैकी काही खोडकर विद्यार्थी मला छडीने मारतात. शाळेतून घरी जाताना माझ्यावरती नाना प्रकारचे काही पण लिहितात.यामुळे मला अतिशय राग सुद्धा येतो परंतु तुम्ही विद्यार्थी आहे म्हणून मी हा राग शांत करून तुम्हाला माफ करीत असतो
मित्रा या शाळेत माझ्यावरती लिहून वाचून अनेक विद्यार्थी मोठमोठाले ऑफिसर झाले. अनेकांना सरकारी नोकऱ्या लागल्या म्हणून माझे शिक्षणा मध्ये अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. मग मी कोणत्याही स्वरूपात उपलब्ध असो.
मी निस्वार्थ भावनेने तुमची सेवा करीत असतो.म्हणून तुम्ही सर्वांनी फळ्याचे माझे आभार मानणे आवश्यक आहे आणि माझी काळजी पण घेणे आवश्यक आहे माझ्याबद्दल कितीही सांगितले तरी कमीच आहे म्हणून मित्रा दुसऱ्यांची सदैव निस्वार्थ भावनेने माझ्या प्रमाणे मदत करीत जाआणि एवढे माझे चार शब्द ऐकून घेतल्यामुळे तुझी धन्यवाद एवढे बोलून फळ्याचे बोलणे शांत झाले.
1 टिप्पण्या
We are very enjoyed Wikipedia services..💫🎉
उत्तर द्याहटवा