mi rasta boltoy atmakatha in marathi nibandh: नमस्कार मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण मी रस्ता बोलतोय मराठी निबंध म्हणजेच रस्त्याचे आत्मकथन हा निबंध बघणार आहोत. मी रस्ता बोलतोय निबंध मध्ये जर रस्ता बोलला तर काय बोलेल हे सांगण्यात आले आहे. रस्त्याचे आत्मवृत्त निबंध वर्ग 5 ते 10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे यामध्ये थोडा बदल करून तुम्ही आपल्या शब्दांमध्ये हा निबंध लिहू शकता तर सुरू करूया मी रस्ता बोलतोय हा निबंध.रस्त्याचे मनोगत मराठी निबंध.
मी रस्ता बोलतोय मराठी निबंध आत्मकथन | mi rasta boltoy atmakatha in marathi nibandh
mi rasta boltoy atmakatha in marathi nibandh |
मी रस्ता बोलतोय मराठी निबंध:
मित्रांनो मी रस्ता बोलतोय मला तर तुम्ही ओळखताच मी जगामध्ये मध्ये असतो. मित्रांनो वास्तविक पाहता मानवी जीवनाच्या प्रारंभीपासून मी मानवाची सोबत करीत आहे.
माझा जन्म हा जेव्हा केव्हा तुमच्या पूर्वजांनी म्हणजेच आदिमानवाने आपले प्रथम पाऊल ठेवले असेल तेव्हा झाला.जसा जसा मानव हा अधिक अधिक चालू जास्त चालू लागला तसा तसा माझा विकास आणि विस्तार होऊन मी वाढत जाऊन मोठा झालो.
आजच्या काळात मानवाने जी काही प्रगती केली त्या प्रगतीचा मी साक्षीदार आहोत.मधूनच रस्ता म्हणजे प्रवास रस्ता म्हणजे जीवन अशी व्याख्या तयार झाली आहे.
सुरुवातीच्या काळामध्ये मानवाचे जीवन अतिशय कष्टमय आणि खडतर होते.म्हणूनच माझी रुप हे ओबडधोबड व खडकाळ होते मी काट्याकुट्यांनी भरलेला होतो त्यावेळी माझ्या वरून प्रवास करताना मानवाला खूप त्रास होत असे.
माणूस ईकडे तिकडे भटकू नये किंवा संकटात सापडू नये म्हणून मलाच मानवाची काळजी घ्यावी लागत असे मानवाला योग्य मार्ग दाखवणे हेच माझे जीवन कार्य आहे.
जेव्हा मी मानवाला त्याच्या इच्छित स्थळी योग्य दिशेने नेतो आणि ती जेव्हा आपल्या इच्छित स्थळावर पोहोचतो तेव्हा मानवाच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद बघून मला खूप छान वाटते. माणसाच्या सुखाच्या वाटेवरील मी सोबती आहे माझ्या शिवाय मानव जीवन अशक्य आहे.
मित्रांनो ज्याप्रमाणे मानवाने आपल्या सुरुवातीपासून च्या तर आत्तापर्यंतच्या जीवनात खूप हाल अपेष्टा सहन केल्या त्याच प्रमाणे मला सुद्धा खूप हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या.आता मी तुम्हाला जसा मोठा छान सुंदर एक्सप्रेस रुंद आणि गुळगुळीत दिसतो तसा मी सुरुवातीला नव्हतो.
सर्वात आधी मी एक छोटी पाऊल वाट होतो.पायरस्ता चे माझे प्रारंभी के स्वरूप होते.
मानवाची प्रगती झाली आणि मानवाने बैलगाडी निर्माण केली तेव्हा मी स्वतःला थोडे रुंद केले, कालांतराने मोटर गाडी आली तेव्हा माझ्या अंगावर लहान-मोठे दगड काढून माझ्या वरील खड्डे बुजवण्यात आले.
अशा प्रकारे मी कच्च्या रस्त्याच्या रूपात मी तुमच्या सेवेत हजर झालो.जेव्हा माझे स्वरूप थोडे कच्चे होते तेव्हा माझ्या अंगावरून एखादे वाहन गाडी वेगाने गेले असता सर्वत्र धुळीचे लाट उसळत असे.
मात्र जसजसे मानवाचे जीवन सुधारत गेले तसतसा माझ्यात खूप बदल झाला.
मी डांबरी रस्त्याचे स्वरूप घेतले. मग मात्र माझे स्वरूप वेगाने बदलले एक पदरी दुपदरी चौपदरी महामार्ग असे इत्यादी रूप मी धारण केले.आता तर मला एक्सप्रेस हायवे हे अत्यंत देखणे रूप मिळाले आहे यामुळे मला खूप आनंद आणि अभिमान वाटतो.
पण मित्रहो आज मला अतोनात दुःख पण होत आहे.कारण मी अतिशय गुळगुळीत असल्याकारणाने तुम्ही मानव मोटारसायकली वाहने खूप जोरात चालवता त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. कोठे कोठे माझ्या अंगावर असंख्य खड्डे पडले आहे या खड्ड्यांमुळे जावे तिथे सर्वत्र वाहतूकीचा खोळंबा आणि अपघाताच्या मालिका दिसते.पावसाळ्यात तर परिस्थिती खूपच वाईट होते .
तुम्ही सर्व लोक या गैरव्यवस्थेला मला जबाबदार धरुन माझ्या नावाने सतत आरडाओरडा करत असतात हे ऐकून मला अतिशय त्रास होत आहे अरे सांगा या अनागोंदी परिस्थितीला खरच मी जबाबदार आहे का?
1 टिप्पण्या
Mala he nibhand khup vachayala avdtat
उत्तर द्याहटवा