letter writing in marathi | पत्र लेखन मराठी | patra lekhan marathi aupcharik 2024

 नमस्कार मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण  letter writing in marathi पत्र लेखन मराठी  मध्ये पत्र लेखन बघणार आहोत.

पत्रलेखन दहावी उपयोजित मराठी  मधील सर्वात महत्त्वाचा भाग आहे. इयत्ता दहावीच्या कृतीपत्रिका मध्ये प्रश्न पाचवा यामध्ये आपल्याला एखाद्या निवेदन, जाहिरात, बातमीचे शीर्षक, बातमी व सूचना फलक यांच्यापैकी एक आपल्याला चौकटीमध्ये दिले जाईल आणि त्यावरून आपल्याला पत्रलेखन करायचे आहे. Letter writing in Marathi,Patra lekhan in Marathi ला एकूण सहा गुण असतात.

letter writing in marathi  पत्र लेखन मराठी
 letter writing in marathi  पत्र लेखन मराठी 

letter writing in marathi | पत्र लेखन मराठी |patra lekhan marathi aupcharik 2024

पत्रलेखनाचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात
  1. औपचारिक पत्र
  2. अनौपचारिक पत्र

1.औपचारिक पत्र  aupcharik patra in marathi

letter writing in marathi:औपचारिक पत्र म्हणजे कार्यालयीन व व्यावसायिक स्तरावरील पत्रे.
रोजच्या जीवनामध्ये आपल्याला अनेक समस्या कार्यालयीन अडचणींना सामोरे जावे लागते. व  त्या कार्यालयीन अडचणी सोडविण्याकरिता करिता आपण एखाद्या मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तींला, एखाद्या कार्यालयाला, एखाद्या मॅनेजरला किंवा एखाद्या मुख्याध्यापक यांना जे पत्र लिहितो त्या पत्राला औपचारिक पत्र असे म्हटले जाते.साध्या भाषेत सांगायचे म्हणजे ऑफिशियल पत्र म्हणजे औपचारिक पत्र होय.

औपचारिक पत्राचे प्रकार

औपचारिक पत्रा चे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात एक म्हणजे मागणी पत्र आणि दुसरे म्हणजे विनंती पत्र.

  1. मागणी पत्र 
  2. विनंती पत्र.

औपचारिक पत्रा चे फॉरमॅट आराखडा aupcharik patra

 lekhan in marathi new format 

सर्वात आधी आपण पारंपरिक पद्धतीने पत्रलेखन करत असो त्यामध्ये प्रति प्रेक्षक असे शब्द वापरले जायचे पण आपल्याला या वर्षी ई-मेल पद्धतीने पत्र लेखन करायचे आहे ईमेल पत्रलेखन पद्धती ही पारंपरिक पत्रलेखन पद्धतीपेक्षा वेगळी आहे.
पत्रलेखनाचा आराखडा आता बदललेला आहे नवीन आराखड्यानुसार आपण उजव्या बाजूला काहीही  लिहित नाही. सर्व आपण आता डाव्या बाजूला लिहितो.
चला तर मग बघुया औपचारिक पत्राचा आराखडा मायना aupcharik patra lekhan in marathi new format

1.पत्राचा दिनांक : पत्राची दिनांक लिहिताना महिना पूर्ण शब्दांमध्ये लिहायचा असतो उदाहरणार्थ २४ सप्टेंबर २०२१ याप्रकारे
2.पात्रा स्वीकारणाऱ्या चे नाव हुद्दा पत्ता
औपचारिक पत्र लिहित असल्याने सर्वात प्रथम प्रति त्यानंतर माननीय असे लिहून त्यानंतर त्यांचे पद लिहावे उदाहरणार्थ माननीय संचालक माननीय मुख्याध्यापक याप्रमाणे.

3.पत्राचा विषय पत्राचा विषय हा एका ओळीत लिहावा.

4.अभिवादन अभिवादन यामध्ये माननीय महोदय कसे लिहावे

5.पत्राचा शेवट
औपचारिक पत्रा मध्ये पत्रा चा शेवट करताना आपला कृपाभिलाषी किंवा आपला नम्र असे लिहितात.
6.पत्र लेखकाचे नाव पत्र लेखकाचा पत्ता ईमेल आयडी


औपचारिक पत्र लेखन उदाहरण patra lekhan in marathi examples

मागणी पत्र लेखन मराठी  उदाहरण शालेय ग्रंथालयासाठी पुस्तकाची मागणी करणारे पत्र लिहा


दिनांक 25 डिसेंबर 2019
प्रति,
माननीय संचालक
अमर बुकडेपो वरळी मुंबई ४५०००१ 

विषय : शाळेच्या ग्रंथालयासाठी पुस्तकाची मागणी

माननीय महोदय

मी नेहरू शाळेचा विद्यार्थी प्रतिनिधी आहे शाळेच्या मुख्याध्यापका च्या वतीने परवानगी पत्र लिहीत आहे आमच्या शाळेच्या ग्रंथालयासाठी पुस्तकाची गरज आहे आपण पाठवलेल्या यादीतून आम्हाला काही पुस्तके हवी आहे.शिक्षकाने सांगितलेल्या प्रमाणे पुढील  पुस्तके आमच्या ग्रंथालयासाठी आम्ही मागवत आहोत.
आम्ही तुमचे नियमित ग्राहक असल्यामुळे पुस्तकावर योग्य ती नोंद घ्यावी वरील पुस्तकाचे बील  पाठवावे तसेच पत्र मिळताच पुस्तके लवकरात लवकर पाठवण्याची कृपा करावी

आपला कृपाभिलाषी

विद्यार्थी प्रतिनिधी 
अ.ब.क.
नेहरू विद्यालय
 वरळी मुंबई




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या