नमस्कार वाचकांनो आज मी आपल्यासाठी सफाई कामगार निबंध मराठी/ safai kamgar nibandh in Marathi सांगणार
आहो. या मध्ये तुम्हाला सफाई कामगार या विषयी माहिती,सफाई कामगार नसते तर काय होईल त्यांचे वर्णन सांगण्यात आले आहे.
तर चला मग बघूया निबंध
सफाई कामगार निबंध मराठी / safai kamgar nibandh in Marathi
आपल्या स्वभावतालचे वा अवतीभवतीचे वातावरण स्वच्छ,साफ सुथरं असलं तर कोणाला नाही,चांगलं वाटणार.प्रत्येक परिसर आणि त्या परिसराचा प्रत्येक कोपरा नि कोपरा स्वच्छ असला अशी जागा सगळ्यांना आवडते.आणि या सगळ्यामध्ये सर्वात मोलाची भूमिका असते तर ती सफाई कामगाराची.आपण प्रत्येकजण आपल्या घराची स्वच्छता रखतो त्याप्रमाणेच,आपला परिसर स्वच्छ आणि साफ ठेवण्याचे काम हे सफाई कामगार करतात.आपल्या देशात सफाई कामगार हा एक अत्यंत महत्वचा भाग आहे.ते रेल्वे स्टेशन,विमानतळ,बँक,कंपन्या,बसस्थानक, सिनेमाहॉल आणि आपल्या परिसरात आणि बर्याच ठिकाणी काम करतात. सफाई कामगार हे रोज आपल्या परिसरात येऊन रोड झाडणे,रस्त्यांची साफसफाई करणे, रस्त्यावरील घाण साफ,नाल्या स्वच्छ करणे आणि बरेच कामे करतात त्यामुळे आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर दिसतो.
ग्रामीण भागात प्रत्येकाच्या घरोघरी सफाई कामगार घंटागाडी घेऊन
येतो आणि कचरा नेतो याप्रमाणे तो समाजात आपली
भूमिका निभवत असतो.परंतु समाजात बरेच लोक सफाई कामगारांना कमी लेखतात त्याच्याशी योग्य
वागणूक करत नाही.जर समाजात सफाई कामगारांनी काम करणे जर बंद केले तर रस्त्यावरील
विविघ प्रकारचा कचरा आणि आपण कचराकुंडीत टाकलेले कचरा जर कामगारांनी उचलला नाही तर
तो सर्व कचरा सडून जाईल.आणि सर्वत्र परिसरात दुर्गंधीच वातावरण पसरेल.त्यामुळे कित्येक
प्रकारच्या रोगराई पसरेल.वरहांचा गोंगाटा वाढेल.आणि आपल्या आरोग्यावर त्याचे वाईट परिणाम
पडेल.म्हणून सफाई कामगाराचे समाजात खूप महत्वाचे स्थान आहे म्हणून त्याच्याशी योग्य
प्रकारे राहणे गरजेचे आहे.
सफाई कामगार हा निरंतर ईमानदारीने काम करतो.पण त्यामध्ये त्यांना
योग्य प्रमाणात वेतन मिळत नाही. साफ सफाई केल्या नंतर त्यांना कोणी हात धुण्यास पाणी
देत नाही. पण असे लोकांनी त्याच्यासोबत असे नाही केले पाहिजे.त्यांना पण एक चांगला
व्यक्ति समजले पाहिजे.आणि त्याच्याशी मैत्री भावनेने राहिले पाहिजे.
सफाई कामगार त्याचे काम दिवस असो की रात्र ते पूर्ण मेहनीतीने
आणि ईमानदारीने करतात.त्यामुळेच आपला परिसरआणि देश स्वच्छ बनला आहे. म्हणूनच आपण
सफाई कामगारांचा आदर केला पाहिजे.
तर सफाई कामगार निबंध आपल्याला कसा वाटला खाली कमेन्ट मध्ये नक्की कळवा. धन्यवाद.
हे पण वाचा रेल्वे सेवा बंद झाली तर
0 टिप्पण्या