तर मग सुरू करूया.
1) झुक झुक आवाज करणारी म्हणजे रेल्वे होय.
2) आज या जगात असा एकही व्यक्ती नसेल की त्याला रेल्वे माहित नाही.
3) रेल्वे हा जगामध्ये दळणवळणाचा मुख्य स्त्रोत आहे.
4) रेल्वेमुळे अनेक गावे शहरे एकमेकाला जोडले जातात
5) रेल्वेमुळे आपले काम लवकर लवकर आणि सुलभ होते.
6) रेल्वे ही सर्वांची मदत करते कामगार असो वा विद्यार्थी असो वा गरीब असो वा श्रीमंत असो की कोणामध्येही भेदभाव करत नाही.
7) पण ही रेल्वेसेवा बंद झाली तर, आपल्या जीवनात त्याचे काय परिणाम होतील
8) रेल्वे सेवा बंद झाली तर सर्व कामे रखडून जातील.प्रत्येक काम करण्यासाठी गावाला जाण्याकरिता आणि लांबचा प्रवास करताना खूप वेळ लागेल.
9) बसस्थानकामध्ये प्रचंड प्रमाणात गर्दीचे वातावरण पसरेल आणि रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण सुद्धा वाढेल.
10) म्हणून रेल्वे सेवाही कधीही बंद झाली नाही पाहिजे तिचे काम असेच सुरळीत चालू राहिले पाहिजे.
हा होता शॉर्ट मराठी निबंध आता आपण बघूया सविस्तर पणे
रेल्वे सेवा बंद झाली
तर ४०० शब्दात | Railway seva band zali tar
तशी तर किती कठीण परिस्थिती ओढवेल याची कल्पना सुद्धा करता येत नाही रेल्वे ही देशाच्या आणि जगाच्या प्रत्येक भागा मध्ये आहे.रेल्वे आपल्याला विविध मार्गांनी मदत करत असते. आजच्या युगात रेल्वेमुळे आपली वेळेची बचत तर होतेच त्यासोबतच पैशाची बचत सुद्धा होते.
आजच्या युगात प्रत्येक जण लहान असो वा मोठा कामगार असो वा
शेतकरी, शाळकरी विद्यार्थी असो वा
कोणीही असो तो रेल्वेचा वापर आपल्या कामासाठी करत असतो.
दोन शहरांना एकमेकांना जोडण्याचे काम हे रेल्वेमुळे शक्य होते.
विविध संस्कृती जोडण्याचे काम रेल्वे करत असते. त्यामुळे विविध संस्कृती आणि
समाजाचा रेल्वेमुळे विस्तार होतो. पण ही रेल्वे सेवा बंद झाली तर आपल्याला खूप
त्रास सहन करावा लागेल.
रेल्वे सेवा बंद झाल्याने जर आपल्याला दूर चे अंतर गाठायचे असेल तर आपल्याला खूप वेळ लागेल.
आपण नेहमीच टीव्ही किंवा वृत्तमान पत्रामध्ये वाचतो किंवा एकतो की दुष्काळग्रस्त भागात रेल्वेने मदत केली जात आहे जर ही रेल्वेसेवा बंद झाली तर ही सेवा कोण पुरवणार आणि किती मोठे संकट निर्माण होईल.
रेल्वेमध्ये आपल्या उपभोगाच्या अनेक वस्तूंची ने-आण होत असते
जसे की दूध, कोळसा. गहू तांदूळ अशा
अनेक वस्तूंची ने-आण होत असते पण रेल्वे सेवा जर बंद झाली तर या सर्व वस्तूंची ने आन करण्याचा प्रश्न उभा मोठा
होईल.
मुंबईसारख्या शहरात काही कारणांनी रेल्वे धावायच्या थांबल्या
तरी गोंधळ उडतो. तर मग रेल्वे कायमची थांबली तर या शहरांची नाकी नऊ येतील.
आज जगात कोठेही आपत्ती आली तर जगाच्या कानाकोपऱ्यातून मदत येते
मग रेल्वे सेवा बंद झाली तर ही मदत कशी येणार त्यामुळे
रेल्वे सेवा बंद पडून चालणार नाही
0 टिप्पण्या