प्रजासत्ताक दिन प्रसंग लेखन मराठीमध्ये / prajasattak din prasang lekhan

 

नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आज आपण शाळेतील प्रजासत्ताक दिन प्रसंगलेखन  बघणार आहो, तर चला मग सुरवात करूया, प्रजासत्ताक दिन प्रसंगलेखन हा परीक्षेमध्ये नेहमी विचारला जाणारा प्रश्न आहे. 

प्रजासत्ताक दिन प्रसंगलेखन

२६ जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन माझ्या शाळेत प्रजासत्ताक दिनानिमीत्ताने ध्व्जारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ध्व्जारोहनाच्या कार्यक्रमाची वेळ ही सकाळी सात वाजत होती, म्हणून मी आधल्या दिवशीच माझ्या शाळेचा ड्रेस स्वच्छ धुवून इस्त्री केला.व सकाळी लवकर उठून आंघोळ करून शाळेत गेलो,तर बघतय तर काय शाळेत सर्वत्र देशभक्तिच वातावरण होत. सर्वत्र देशभक्तिवर गीत सुरू होते. 

ध्व्जारोहनाच्या कार्यक्रमाचे स्थळ म्हणजे माझ्या शाळेचे मैदान. संपूर्ण शाळेचे मैदान हे अगोदरल्या दिवशी नीट स्वच्छ करून त्यावर रांगेत उभे राहण्याकरिता सरळ रेषा पांढर्‍या चुन्याने आखून घेतल्या होत्या. आणि वर तोरणे लावण्यात आली होती. सर्वत्र उत्सवाच वातावरण होत. मग पटापट शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांच्या सरळ रेषेत रांगा लावल्या. आणि कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आले.

त्यानंतर ध्व्जारोहन करण्यात आले.सर्वांनी राष्ट्रीय झेंडा तिरंगा याला सलामी दिली,आणि मग राष्ट्रीय गीत व प्रतिज्ञा झाली. नंतर विधार्थ्यांनी तयार केलेली देशभक्तिवर गीत म्हणण्यात आले. आणि मग प्रमुख पाहुणे आणि शाळेचे मुख्याध्यापक यांची भाषणे झाली.

प्रजासत्ताक दिनानिमीत्त शाळेमध्ये विविध सांसस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.त्यामध्ये देशभक्तिवर नाटक, नृत्य आणि भाषण होते. मी पण सांसस्कृतिक कार्यक्रमामध्ये भाषण दिले.आणि नाटक पण सादर केले त्यामध्ये माझे खूप कौतुक झाले.

प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी सर्वांनी आपले योगदान दिले व सहभाग दिले.त्यानंतर आभार प्रदर्शन करण्यात आले आणि सर्व विद्यार्थ्यांना चॉकलेट देण्यात आले आणि प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. अशा प्रकारे माझ्या शाळेतील प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम झाला.

तर हे होत  शाळेतील प्रजासत्ताक दिन प्रसंगलेखन मराठीमध्ये तुम्हाला प्रसंग लेखन कस वाटल तर काही टिप्पणी करून नक्की कळवा, आणि आपल्या सोशल मीडिया वर शेअर करा धन्यवाद. भेटूया पुढच्या लेखामध्ये 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या